कारंजा : - "कारंजा येथील श्री नवदुर्गा उत्सव म्हणजे आनंदाची पर्वणी असते." कारंजा हे पौराणिक ऐतिहासिक शहर असून, शहरातील प्राचिन व ऐतिहासिक मंदिरे, श्री कामाक्षा मातेच्या, श्री एकविरादेवी, श्री यक्षिणीदेवी, श्री चंद्रावळीदेवी आणि श्री पद्मावती ह्या प्राचीन मंदिरामुळे, मातृशक्ति उपासकांचे शक्तीस्थळ म्हणून ओळखले जाते. कारंजा शहराचे आद्य शिल्पकार श्री वसिष्ठ मुनींचे शिष्य करंज ऋषी हे मातृशक्ति उपासक असून स्वतः त्यांनी ह्या मातृदेवतांची उपासना केल्याचा आणि अलिकडच्या शिवकालिन काळात स्वतः राजे शिवछत्रपती शिवरायांनी ह्या मातृशक्तिचे दर्शन घेतल्याचाही इतिहासात उल्लेख असून, येथील नवरात्रीला फार महत्व आहे. या शिवाय शहरात श्री रेणुकामाता, श्री जगदंबा माता, श्री नवशक्ती धाम, श्री संतोषी माता, श्री तुळजाभवानी श्री जगजननी मातेची मोठी मंदिरं असून नवरात्रात तर भाविकांची मांदियाळी बघायला मिळते. शिवाय शारदिय नवरात्रोत्सवा निमित्त, प्रत्येक वार्ड, मोहल्ले, कॉलेनी इ .ठिक ठिकाणी श्री नवदुर्गोत्सव व श्री शारदा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. आता सोमवार दि २६ सप्टेंबर रोजी श्री नवदुर्गेची घटस्थापना होणार असून,अवघ्या पंधरा दिवसांवर श्री नवदुर्गोत्सव आल्यामुळे शहरातील विविध मंडळांनी आतापासूनच तयारी सुरु केली असून, महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांना स्थानिक जिजामाता मित्र मंडळाच्या, जिजामाता श्रीनवदुर्गा उत्सव मंडळाने माहिती दिली असून ह्या मंडळाने आगमन सोहळा सुरु केल्याचे कळविण्यात आले आहे.