सिंदेवाही:- पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील शिवणी वन परीक्षेत्र कंपार्टमेंट नंबर 322 मधील पेटगाव-खातेरा जंगल परिसरात महिला ही तेंदूपत्ता संकलनासाठी नियमित वेळेत गेली असता,त्यांच्येवर दिनांक 04/05/2023 रोजी सकाळी 08:30 च्या सुमारास पट्टेदार वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना निदर्शनास आली. सदर घटनेत मृतक महिलेचे नाव- दीपा दिलीप गेडाम (वय-35 वर्ष) रा.बामणी(माल) ता.सिंदेवाही जि.चंद्रपूर येथील रहिवासी आहे.
या घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही पोलीस स्टेशनचे ठाणेदार तुषार चव्हाण व चमू तसेच वन विभागाची चमू घटनास्थळी दाखल झाली.तेथील लोकांच्या जमावाला संयमाने सुव्यवस्था कायम राहावी यासाठी विशेष सुरक्षा प्रदान केली.त्याचप्रमाणे घटनास्थळी जमलेल्या ग्रामस्थांची समजूत काढून वन विभागाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच प्रेत ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे शव विच्छेदनासाठी हलविण्यात आले.सदर ठिकाणी कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी विशेष सुरक्षा ठेवून बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे.