वाशिम : इ.सन 2014 पासून केन्द्रात भाजपा सरकार स्थापन होताच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत घरकुल योजनेचा कार्यक्रम सुरु केला.परंतु ह्या प्रधानमंत्री घरकुल योजनेपासून, गेल्या पंधरा वर्षांपासून,शहरात राहणारे नगर पालिका क्षेत्रातील, प्रजासत्ताक भारतातील मतदार असणारे खरे गरजू भुमिहिन,बेघर,निराधार,दिव्यांग व्यक्ती आणि भटकंती करणारे भटक्या जमातीच्या व्यक्ती व त्यांचे कुटूंबीय वंचितच असल्याचे भिषण वास्तव आहे.आज प्लॉटधारक मध्यमवर्गियांना (स्वखर्चाने बांधकाम करण्यास समर्थ असणाऱ्या) आणि शासकिय जमिनिवर अतिक्रमण करणाऱ्या अतिक्रमित कुटुंबीयांना घरकुलाचा लाभ मिळत आहे.मात्र खरोखर गरजवंत असणाऱ्या खऱ्या खुऱ्या,भुमिहिन असणाऱ्या, बेघर,निराधार,दिव्यांग,भटकंती करणारे भटके व त्यांचे कुटुंबीय मात्र प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलापासून सर्वार्थाने वंचित आहेत.तसेच स्वातंत्र्यापूर्वी पासून अनेक कुटूंब मंदिर,दरगाह इत्यादी संस्थान किंवा प्रार्थनास्थळाच्या आश्रयाने पिढ्यान पिढ्या राहून नगर पालिकेच्या मालमत्ता कराचा नियमीतरित्या भरणा करीत असूनही ह्या कुटूंबीयाकडे नमूना ड नसल्यामुळे शासनाने त्यांना प्रधानमंत्री योजनेपासून कायमच वंचित ठेवलेले आहे.त्यामुळे मंदिर दरगाह इत्यादी संस्थानच्या आश्रयाला राहणाऱ्या आणि शहरातील गरजवंत भूमिहिन,निराधार,दिव्यांग असलेल्या कुटूंबीयां करीता जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार श्रीमती सईताई डहाके, आमदार अमितजी झनक, आमदार श्याम खोडे, शिक्षक आमदार, ॲड किरणराव सरनाईक, आमदार धिरज लिंगाडे इत्यादी विधानसभा व विधानपरिषद आमदारांनी विधानभवनात तारांकित प्रश्न मांडून जिल्हातील सर्व गरजवंत, बेघर,भुमिहिनांची आणि महत्वाचे म्हणजे दिव्यांग व्यक्ती व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबियांना शासनामार्फत प्रधानमंत्री (आवास) घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवाज बुलंद करावा व मुख्यमंत्री ना. देवेन्द्रजी फडणवीस यांचेकडून भुमिहिन दिव्यांगाच्या घरकुलासाठी शासकिय भूखंडासह मंजूरी मिळवून घ्यावी तसेच जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तात्काळ जिल्ह्यातील भूमिहिन, बेघर, निराधार आणि दिव्यांगाचे सर्व्हेक्षण करून गरजवंताची माहिती गोळा करून त्यांना शासनामार्फत भूखंड उपलब्ध करून देत भूखंडासह प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुलाचा लाभ देण्याची मागणी महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी आमदार श्रीमती सईताई डहाके, आ. अमित झनक, आ श्याम खोडे, आ. ॲड किरणराव सरनाईक,आ. धिरज लिंगाडे यांना केली आहे.