७५ वा आजादी का अमृत महोत्सव निमित्त दि. २०/०४/२०२२ रोजी ग्रामिण रुग्णालय, ब्रम्हपुरी येथे भव्य मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन माजी आमदार अतुलभाऊ देशकर यांचे हस्ते करण्यात आले. शिबीराकरीता प्रमुख पाहुणे म्हणून सौ. रिताताई उराडे (नगराध्यक्ष) यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदर शिबीरात आयुष्यमान भारत डिजीटल मिशन अंतर्गत रुग्णांची नोंदणी व हेल्थ ID कार्ड तयार करण्यात आलेत तसेच महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत गोल्डन ID कार्ड तयार करुन - देण्यात आले.
या शिवीराला मोठया संख्येने उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. आणि आरोग्य शिबीराकरीता ८४४ रुग्णांची नोंदणी करण्यात आली. ग्रामिण रुग्णालय, ब्रम्हपुरी येथील वैद्यकिय अधिक्षक डॉ. प्रितम खंडाळे सर तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विलास दुधपचारे सर तसेच अधिकारी/कर्मचारी यांच्या अथक परिक्षमाने हा आरोग्य शिबीर पार पाडण्यात आला.