वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : वाशिम यवतमाळ लोकसभा मतदार संघाकरीता शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे तथा राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांचे मार्गदर्शन व उपस्थितीमध्ये आणि प्रचंड जनसागराच्या सर्वसाक्षीने महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेद्वार संजय उत्तमराव देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल.उमेद्वारी दाखल करतेवेळी कारंजा, मानोरा,वाशिम,मंगरूळपिर, पुसद, दिग्रस, यवतमाळ येथील महाविकास आघाडी मधील सहभागी सर्वच राजकिय पक्ष नेते आणि कार्यकर्ते यांनी दाखवीले प्रचंड ऐक्य.कारंजा येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे सलिम तेली,रवी पवारसह, गणेश बाबरे, विलास सुरडकर,दत्ताभाऊ तुरक, शंभूराजे जिचकार, प्रिया महाजन, माणिकराव पावडे, अविनाश दहातोंडे व सर्वच सेना पदाधिकारी, शिवसैनिक, कारंजाचे माजी नगराध्यक्ष अरविंद लाठीया, राजीक शेख, प्रदिप वानखडे, सुरजीतसिंग भाटीया, ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे तसेच हजारो काँग्रेस कार्यकर्त्याची व मतदारांची होती कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघामधून प्रचंड प्रमाणात उपस्थिती.
यावेळी युवानेते आदित्य ठाकरे तसेच राष्ट्रवादीचे युवा नेते रोहीत पवार यांच्या प्रमुख मार्गदर्शन व उपस्थितीमुळे महाविकास आघाडी सह उपस्थित मतदारामध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण दिसून येत होते.तर लोकप्रियतेचे उच्च शिखर प्राप्त केलेले महाविकास आघाडीचे उमेद्वार संजय उत्तमराव देशमुख यांचा विजय होण्याचे स्पष्ट संकेत मतदाराकडून मिळत होते.