धानोरा तालुक्यातील रांगी परिसरातील शासकीय आश्रमशाळेच्या बाजूला मोठ्या तलावात एक नीलगाय मृतावस्थेत आढळली. वनकर्मचाऱ्यांनी स्थानिकांच्या मदतीने नीलगाय पाण्यातून बाहेर काढली. वन्यप्राण्याने पाठलाग केल्याने नीलगायीने तलावात उडी घेतली व पाण्यात बुडून दगावली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नरेश अलाम, एस. आर. रामगुंडेवार, क्षेत्र सहायक रांगी टी. व्ही. मोहुर्ले, वनरक्षक एम. एन. कोहळे, एम. राऊत आदींनी घटनास्थळी धाव घेतली.