वाशिम/कारंजा (प्रतिनिधी): भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असतांना, दि १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना होऊन, ६२ वर्षे झालेली असतांना आणि दि १ जुलै १९९८ रोजी वाशिम जिल्हा होऊन २५ वर्षे झालेली असतांनाही,कारंजा शहर विकासापासून कोसो दूर राहीले आहे.वास्तविक येथील जैनधर्मिय आणि हिंदुधर्मियांची भारतामध्ये सुप्रसिद्ध असलेली तिर्थक्षेत्र पहाता खरेतर,तिर्थक्षेत्र व पर्यटन आराखड्या अंतर्गत येथील विकास व्हायला पाहीजे.एकदा का तिर्थक्षेत्र पर्यटन विकास आराखडा येथे मंजूर झालाच तर येथे शिक्षणाची,आरोग्याची व्यवस्था होऊन बेरोजगाराच्या हाताला काम आणि तिर्थक्षेत्र व पर्यटना अंतर्गत नवनविन व्यवसाय सुरु होऊन, व्यावसायिकांना व्यवसाय मिळून, विकासामुळे कारंजा शहराचा चेहरा मोहरा बदलवून जाऊ शकतो. एकेकाळी छत्रपती शिवरायांना स्वराज्याकरीता खजीना खुला करून देणाऱ्या आणि दिल्लीहून आलेल्या कस्तुरीच्या व्यापाऱ्यांना भरभरून,सोन्याचांदीच्या मोहरा देणाऱ्या एकेकाळच्या वैभवसंपन्न,ऐतिहासिक, आध्यात्मिक,सांस्कृतिक,धार्मिक, शैक्षणिक शहराची आज विकासा अभावी पार दैना झालेली आहे. स्थानिक जनतेच्या भल्यासाठी येथे शिक्षणाचे व रोजगाराचे कायम स्वरूपी साधन निर्माण होणे गरजेचे आहे.त्याकरीता सर्वप्रथम औद्योगिक वसाहत करून,देश विदेशातून एखादा मोठा प्रकल्प वा उद्योग आणता आला तर त्याची पड़ताडणी महाराष्ट्र शासनाने करायला हवी. चार जिल्ह्याच्या मध्यंतरी असलेले हे शहर शांती अहिंसेचे आणि सर्वधर्म समभावाचे प्रतिक असलेले आदर्श शहर आहे. येथील जमिन,पाणी,हवामान व नैसर्गीक वातावरण चांगल्या उद्योगाकरीता पोषक ठरणारी आहे.त्यामुळे आता या शहराच्या जनतेनेच पुढे यायला हवे आहे. कारण शासन,शासनातील मंत्री, खासदार,आमदार जर विकासाबाबत जनतेची प्रतारणाच करीत असतील तर जनतेने पेटून उठले पाहीजे.संघर्ष केला पाहिजे.कारंजा शहराच्या विकासाकरीता एखादे मोठे आंदोलन उभे राहीले पाहीजे. त्याकरीता आता स्थानिक जनतेने बाहेरचा आमदार कारंजा शहराच्या विकासाकरीता उदासीन राहत असल्याचे कटूसत्य ओळखून,बाहेर गावचा पाहुणा आमदार निवडून देणे सर्वप्रथम बंद करावे.व कोणत्याही परिस्थितीत यावेळी, कोणत्याही जातीधर्माचा असो की कोणत्याही राजकिय पक्षाचा असो परंतु स्थानिक व्यक्तिचीच आमदार म्हणून निवड केली पाहीजे. लक्षात घ्या आता पुढील सहा महिन्यांनीच लोकसभा विधान सभेच्या निवडणूका लागणार आहेत.त्यापूर्वी शासनाने,कारंजा शहराला तिर्थक्षेत्र व पर्यटन विकास आराखड्या अंतर्गत मंजूरी मिळावी म्हणून प्रत्येक खाजगी व सार्वजनिक संस्थाचे, प्रत्येक राजकिय संस्थांचे, स्थानिक स्वराज्य संस्थाचे, प्रस्ताव घेऊन शासनाला पाठवीले पाहीजे.चांगल्या व दर्जेदार शासकिय महाविद्यालयांची, सामाजिक न्याय भवनाची, महाराष्ट्र राज्य औद्योगीक संस्थेची, उद्योग कारखान्याची मागणी शासनाकडे केली पाहीजे. कारंजा तालुक्यात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाने,तिर्थक्षेत्र व पर्यटन विकास आराखड्यातून आमच्या शहराचा विकास करावा अशा आशयाचे,कमितकमी एक पत्र तरी जिल्हाधिकाऱ्या मार्फत मुख्यमंत्री महोदयांना पाठविले पाहीजे.

असे विनंतीवजा आवाहन कारंजाचे महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी केले असून,बस्स पुरे झाले आता "जोपर्यंत सर्वपक्षिय नेते,जनता व पत्रकार खासदार आमदार यांना विकासाबाबत धारेवर धरणार नाही.तोपर्यंत कारंजा शहराचा विकासच होणार नाही." अशी खंत व्यक्त करून आपल्या विचाराशी सहमत होण्याची विनंती केली आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....