अकोला - संपूर्ण महाराष्ट्रlमध्ये चायनीज मांजा मूळे निरपराध नागरिकांचे बळी जात असून पशु पक्ष्याचे सुध्दा जीव जात आहेत. अश्या मांज्याची खुले आमविक्री होत असतांना प्रशासन डोळेझाक करीत आहे. सम्पूर्ण शहरात सर्रासपणे विक्री होत असून चायनीज मांजा खेड्यापात पोहचला असून नागरिकांप्रमाणेपशु पक्षी सुध्दl जीव गमावत असून नागरिकांचा जीव घेणारा मांजा ताबडतोब जप्त करून संबंधीतावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी चायनीज मांजlची होळी करतांना आपला माणूस डॉ अशोक ओळंबे सह गुडमॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी केली असून मांजा मूळे नाहक बळी गेलेल्या अकोट फाईल येथील किरण प्रकाश सोनोने यांच्या परिवाराला शासनाने 10 लाखाची मदत ध्यावी तसेच जखमी झालेल्या नागरिकांना सुध्या भरीव मदत शासनाने करावी अशी मागणी डॉ अशोक ओळंबे, अड संतोष गोळे, दिनकर घोडेराव, गजानन गोलाईत, सुरेंद्र सिरसाट, अरुण मानकर, संतोष काटे यांनी केली.