भाचीच्या वाढदिवसावरून परत गावाकडे येताना दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार मामाचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवर मागे बसलेला तरुण गंभीर जखमी झाला. हा - गडचिरोली मार्गावरील अजयपूरजवळ बुधवारी रात्री ९:०० वाजताच्या सुमारास झाला. या प्रशांत विलास मांढरे (३५, रा. आकाशवाणी रोड, अथर्व कॉलनी, चंद्रपूर) यांचा मृत्यू झाला तर नूतन अरूण आत्राम (२५, रा. अथर्व कॉलनी, चंद्रपूर) हा तरुण जखमी झाला आहे.
प्रशांत मांढरे यांच्या भाचीचा मूल तालुक्यातील आकापूर येथे वाढदिवस होता. वाढदिवसासाठी ते आपल्या एका मित्रासह दुचाकी क्रमांक (एमएच ३४, बीक्यू ७९८५)ने आकापूर येथे गेले होते. वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून ते दोघेही रात्री परत चंद्रपूरला येण्यासाठी निघाले. अजयपूरजवळ आले असता अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली अन् घटनास्थळावरून पलायन केले. या अपघाताची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली.