अकोला :-शेतकरी, वारकरी, युवा, मातृशक्ती, ज्येष्ठ नागरिकांना यांना समर्पित अर्थसंकल्प राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात व उपमुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या सहकार्याने अर्थमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सादर करून महाराष्ट्राला गतिशील करण्याचा संकल्प केला आहे. महिलांच्या सन्मानार्थ "मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण" योजना व अन्नपूर्णा योजना, वारकरी दिंडीला २० हजार रुपये व शेतकऱ्यांना मोफत वीज व राज्यातील १० लाख युवकांना रोजगार उपलब्ध करून देणार व ज्येष्ठ नागरिकांच्या साठी तीर्थ योजना जाहीर करून विविध घटकांना न्याय देऊन सबका साथ सबका विकास सबका विश्वासाने महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्याच्या दृष्टीने अर्थसंकल्प असल्याचे सांगून राज्य सरकारचे अभिनंदन भाजपा प्रदेश सरचिटणीस मा. आ. रणधीरजी सावरकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले.
स्थानिक सर्किट हाउस येथे आयोजित पत्रकार परिषदेत याप्रसंगी खा. अनुपजी धोत्रे, पश्चिम विधानसभा निवडणुक प्रमुख विजयजी अग्रवाल,महानगर अध्यक्ष जयंतजी मसने, जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील, गिरीष जोशी, माधव मानकर, संजय गोटफोडे, देवाशिष काकड आदी उपस्थित होते.