कारंजा : स्थानिक शिवसेना शहर कार्यालयात शहर प्रमुख गणेशराव बाबरे, ज्येष्ठ पदाधिकारी गोपाल पाटील येवतकर, शंभूराजे जिचकार व इतर पदाधिकार्यानी महाराष्ट्र साप्ताहिक पत्रकार परिषद वाशिम यांना मुलाखत देतांना,"शिवसेना सरकारने स्थापन केलेल्या बांठीया आयोगाचा ओबीसी अहवाल ग्राह्य मानून, अखेर सकल ओबीसी समाजाला, आरक्षणाचा लाभ देण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतल्याबद्दल माननिय सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले." यावेळी आपल्या मुलाखतीत गोपाल पाटील येवतकर तथा शहरप्रमुख गणेश बाबरे म्हणाले की, प्रदिर्घकाळापासून प्रलंबीत असलेली ओबीसी समाजाची मागणी आज पूर्ण झाली. सर्वोच्च न्यायालयाने २७% राजकिय आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला हा दिवस राज्याच्या इतिहासात महत्वाचा दिवस आहे. ओबीसी आरक्षणाकरीता कित्येकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले होते. त्यांचे बलिदान आज सार्थ झाले. आणि खऱ्या अर्थाने ओबीसी समाजाला न्याय मिळाला. शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे नेहमी ओबीसी समाजाच्या बाजूने होते. या निकाला मागे त्यांचे सुद्धा मोलाचे योगदान आहे. योग्य निकालामुळे कारंजा तालुका व शहर शिवसेना आनंदी व समाधानी आहे. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे, विजय पाटील खंडार कैलास हांडे इ.उपस्थित होते.