कारंजा (लाड) आपल्या कर्तव्यावर इमाने इतबारे राहून,सेवानिवृत्तांना न्याय्य हक्क मिळवून देणाऱ्या,कारंजा पंचायत समितीचे वरिष्ठ सहाय्यक,रहेमतखाँ पठान यांच्या निःस्वार्थ कार्याची दखल घेऊन,स्थानिक महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेने ज्येष्ठ पत्रकार जिनवरजी तायडे यांच्या अध्यक्षतेखाली,पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत, रहेमतखॉ नियामतखाँ पठाण यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.
व त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्यात. यावेळी बोलतांना संजय कडोळे म्हणाले, " रहेमतखॉ नियामतखॉ पठाण यांनी आपल्या कर्तव्यावर काम करीत असतांना,तालुक्यातील अनेक कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देत त्यांचे आशिर्वाद प्राप्त करून घेतले आहेत.अशा आदर्श व्यक्तीचा सत्कार करणे हे आपले कर्तव्य असते.त्यामुळे सेवेत कार्यरत असणाऱ्या इतरही अधिकारी कर्मचारी यांचे आपले कर्तव्या प्रती सदैव जागरूक राहण्याचे मनोबल वाढत असते." यावेळी विजय पाटील खंडार,कैलास हांडे,माजी सरपंच प्रदिप वानखडे यांची उपस्थिती होती.