कारंजा (लाड) : कारंजा शहरात व्यवहारात पाचशे रुपयाच्या नोटा असण्याची सर्वदूर चर्चा सुरु असल्यामुळे विशेषतः दुकानदार सतर्कता म्हणजे सावधगीरी बाळगत असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे नोटा घेतांना दुकानदार जशी पाचशे रुपयाची नोट आलटून पालटून निरीक्षण करून स्विकारतात. त्यापेक्षा कितीतरी पटीने सामान्य नागरीकांनी पाचशे रुपयाची नोट घेतांना जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. कारण विशेषत: अशिक्षीत (निराक्षर) मंडळी, वयोवृद्ध निवृत्ती वेतन धारक, मजूर, कामगार आणि महिला मंडळीची नकली नोटा मुळे फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.त्यामुळे पाचशे रुपयाच्या नोटा आपण विश्वासू व परिचित व्यक्तीकडून आणि पूर्णत: तपासणी करूनच घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.