कारंजा : अखिल जगताला आध्यात्म्याचा संदेश देणाऱ्या, मराठवाड्यातील नांदेड येथील गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब या भल्यामोठ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गुरुद्वाराला आणि शिख धर्मियांचे १० वे गुरु श्री गुरु गोविंदसिंहजी यांच्या पवित्र पावन समाधी स्थळाच्या दर्शना करीता भेट देवून,कारंजा . विदर्भ लोककलावंत संघटनेच्या लोककलावंत आणि दिव्यांग जनसेवक संजय कडोळे तथा प्रदिप वानखडे यांनी गुरुद्वारा मध्ये आपला माथा टेकवीला. याप्रसंगी त्यांनी महाराजा रणजीत सिंग यांनी स्थापत्य कलेद्वारे निर्माण केलेल्या गुरुद्वाराला मंत्रमुग्ध होवून पहात दर्शन घेतले. तसेच गुरुद्वारा मधील लंगर प्रसादाचा आनंद घेतला.यावेळी संजय कडोळे यांनी आपल्या मनोगता द्वारे व्यक्त होत त्यांनी सांगीतले, संत शिरोमणी नामदेव महाराजांनी महाराष्ट्रा सोबतच पंजाब मध्ये जाऊन केलेल्या वारकरी संप्रदायाच्या महतीमुळेच आपल्याला नांदेड येथील गुरुद्वाराबद्दलची उत्कंठा लागलेली होती. येथे येवून आम्ही गुरुद्वारा आणि पवित्र गुरुग्रंथ साहिबच्या दर्शनाने धन्य झालो. येथील गुरुद्वारा मधील स्थापत्यकला आणि सुवर्णांकित नक्षीकाम पाहून आमच्या डोळ्याचे पारणे फिटले.