कारंजा (लाड):- कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय भाजपा युवा नेते ॲड.ज्ञायक राजेंद्र पाटणी यांनी आयोजित केलेल्या,अखिल भारतीय कबड्डी स्पर्धांचे उद्घाटन विवेक पाटणी यांचे शुभ हस्ते संपन्न झाले.दि.21 सप्टेंबर 2024 रोजी संपन्न झाले.दि.21 सप्टेंबर 2024 पासून दि. 24 सप्टेंबर 2024 पर्यंत अखिल भारतीय कबड्डी सामन्याचे आयोजन करण्यात आले. पहिल्या दिवशी झालेल्या या अखिल भारतीय सामन्यामध्ये ज्युनिअर विदर्भ विरूध्द नागपूर ग्रामीण,बारामती विरुध्द भोपाल, रवींद्र क्रीडा मंडळ उमरेड विरुध्द जय संतोषी माता मंडळ, पुणे विरुद्ध रेवा, इत्यादी सामने खेळण्यात आले.

कारंजा येथे सुरू झालेल्या कबड्डी सामन्यास कबडीपटू स्पर्धक आणि प्रेक्षकाकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सदर्हू सामने स्थानिक स्वातंत्र्यसैनिक कन्हैय्यालाल इन्नानी (विद्याभारती) महाविद्यालय मैदानावर सुरु असून, प्रत्यक्ष सामने बघण्यासाठी नागरिक प्रेक्षकांची प्रचंड भाऊगर्दी उसळत आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयंत भाऊ हुरकट होते. तर प्रमुख अतिथी प्रा.देवरे सर, लोकप्रिय भाजपा युवा नेतेॲड.ज्ञायक राजेंद्र पाटणी,भाजपा शहराध्यक्ष ललित चांडक,विदर्भ कबड्डी संघटना सहसचिव सतीश दफडे, बादशहा धामणे,स्पर्धा निरीक्षक पद्माकर देशमुख,क्रीडा अधिकारी किशोर बोंडे सर,उमेश पाटील ठाकरे,डॉ.अजय कांत ,अशोकसेठ इन्नानी ,राजीव भेंडे,संकेत नाखले,संजय मालवे,रामकिसन चव्हाण, कुलदीप बदर,प्रकाश राठोड,मंगेश धाने,दिनेश वाडेकर अमोल बिजवे ,विजय मुगल, चेतन भेंडे,संतोष गुल्हाने,अमोल गढवाले,सविज जगताप ,अजय जाधव ,प्राजक्ता माहीतकर,शुभांगी रावळे,प्रीती धाकतोड,प्राध्यापक सुनील काळे, श्रीकृष्ण मुंदे,कुलदीप साहेब, प्रा.ठाकरे सर,ललित तिवारी विजय चव्हाण,संतोष शिंदे, संजय लाहे,अक्षय देशमुख, राजेश शेंडेकर सर ,संतोष शिंदे ,शिवाजीराव गायकवाड,सुनील मसने,किशोर धाकतोड,अतुल धाकतोड,देवेंद्र फुके,राजू गाढवे,गजानन डहाके, समीर देशपांडे,गोपाल पुणेवार,विजय मोटघरे, पत्रकार संजय कडोळे,गुल्हाने सर,किरीट रायचूरा,प्रसन्ना साखरकर,ललित तिवारी,अमित भागवत,सचिन कनोजे,संकेत देशमुख,गजानन जाधव ,गणेश गुल्हाने ,अमित संगेवार,अमित पाठे,प्रणव लोणकर,विवेक साबळे,चंदू वारे ,हर्षल काटोले ,अभिनव तापडिया,अभिषेक डोईफोडे, श्रीकांत जीरापूरे इत्यादी होते.या कार्यक्रमात वाशिम जिल्हा कबड्डी अमॅच्युर असोसिएशनचे पदाधिकारी,भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते,वैद्यकीय अधिकारी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व अन्य समिति सदस्य परिश्रम घेत आहेत.कार्यक्रमाचे संचलन प्रा. विवेक गहाणकरी सर यांनी केले.

भाजपा युवा नेते ॲड.ज्ञायक पाटणी व व्यासपीठावरील मान्यवरांनी खेळाडूंची ओळख करून घेत स्पर्धकांना शूभेच्छा दिल्यात.प्रास्ताविक प्रा.डॉ देवरे सर यांनी केले.असे भाजपा तालुका प्रसिध्दी प्रमुख संजय भेंडे यांनी महाराष्ट्र राज्यस्तरीय पत्रकार संजय कडोळे यांना प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....