नागभीड : पुरात वाहून गेलेल्या महिलेचा गुरुवारी सहा दिवसांनंतर पळसगाव शिवारात मृतदेह आढळला. कयादु बळीराम कावडकर (रा. सावंगी बडगे) असे मृतक महिलेचे नाव आहे. पुरात वाहून गेल्याची तालुक्यातील ही तिसरी घटना आहे.
कयादू कावडकर ही महिला सामान आणण्यासाठी २६ जुलै रोजी पळसगावला गेली होती. मात्र ती घरी आली नाही. नाल्याला पूर असल्याने त्यात वाहून गेली, असा अंदाज बांधून शोधाशोध करण्यात आला. मात्र पाच दिवस कुठेच पत्ता लागला नाही. गुरुवारी कबीर गुरनुले हा व्यक्ती शेतावर जात असताना नाल्या एक मृतदेह आढळून आला. ही माहिती त्यांनी आमदार बंटी भांगडिया यांना दिल्यानंतर पोलिसांना कळविली.