विदर्भातील मराठ्यांचे शेकडोच्या संख्येतील जत्थेच्या जत्थे,मिळेल त्या वाहनाने मुंबईकडे रवाना.
अकोला/वाशिम : मराठा योध्दे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात, मराठा आरक्षणासाठी 'न भुतो न भविष्यति' अशा प्रकारची निर्णायक लढाई,मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू झाली असून,मनोज जरांगे पाटील यांनी भर पावसात आझाद मैदानात आमरण उपोषण मांडले असून त्यांनी आता 'मराठा आंदोलन मिळविणारच' ही भूमिका घेतली आहे. त्यामुळे ह्या निर्णयाला पाठींबा देण्यासाठी,कधी नव्हे एवढ्या मोठया प्रमाणात मराठा समाज एकवटला आहे. एकवटत आहे.आता तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून मिळेल त्या वाहनाने मराठे मुंबईकडे रवाना होत आहेत.असे असतांना मग, विदर्भातील मराठे तरी मागे राहणार कसे ? तसेही आंदोलन कोणतेही असो,त्यामध्ये नेहमीच विदर्भाचा वाटा मोठा राहीलेला आहे.त्यामुळेच विदर्भातील मराठा मनोज जरांगे पाटील यांच्या बाजूने उभा राहत आहे. तसेही जात-पात-धर्म-पक्ष-प्रांतवाद-भाषावाद असो किंवा राजकारण असो,सर्व प्रकारचे राजकीय मतभेद बाजूला ठेवून वैदर्भिय मराठा, सामाजिक कार्यासाठी नेहमीच अग्रेसर राहीलेला आहे.शिवाय मनोज जरांगे पाटील यांनी आता 'अभी नही तो कभी नही ।' 'आरक्षण घेतल्या शिवाय 'मुंबई सोडणारच नाही.' अशी टोकाची भूमीका घेतल्यामुळे मराठा आंदोलनाची तिव्रता वाढतच चालली आहे.एव्हाना 'एक मराठा लाख मराठा' अशी गर्जना देत, विदर्भातील मराठे मैदानात दाखल झाले आहेत.दाखल होत आहेत.त्यामुळे पूर्व पश्चिम विदर्भातून आणि अकोला-यवतमाळ-अमरावती- वाशीम- बुलडाण्यातूनही शेकडो मराठ्याचे जत्थेच्या जत्थे, हवा पाणी याची चिंता न करता मिळेल त्या वाहनाने मुंबईकडे आगेकूच करीत असल्याचे विश्वसनिय वृत्त साप्ताहिक करंजमहात्म्य परिवाराला मिळत असल्याचे ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी म्हटले आहे.