कारंजा (लाड) : जून-जुलै महिन्याचे निराधारांना दरमहा मिळणारे अनुदान,ऑगष्ट महिना संपत आलेला असतांनाही,गेल्या दोन महिन्यांपासून मिळाले नसल्यामुळे सणावारांच्या दिवसांमध्ये सर्वधर्मिय दिव्यांग व्यक्ती-विधवा-परित्यक्त्या-वयोवृद्ध महिला आणि निराधार ज्येष्ठ नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊन ते हवालदिल झालेले आहेत.त्यामुळे कारंजा तालुक्याचे कर्तव्यतत्पर आणि दयाळू असलेल्या तहसिलदार यांनी,आता वेळ न दवडता, उपासमारीला तोंड देणाऱ्या, निराधारांच्या पोटाची खडगी भरली जावी म्हणून भावनिक होऊन लवकरात लवकर अविलंब,प्रत्येक निराधारांच्या बँकेच्या खात्यामध्ये,दोन महिन्याच्या अनुदानाची रक्कम टाकण्याची कृपा करावी.अशी सविनय मागणी, उपासमारीला तोंड देत असलेल्या निराधारांच्या वतीने,महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांचेसह केशवराव राऊत, अशोक गोरडे,इम्तियाजबी अजीजशहा,हसन पटेल, सुरेशराव हांडे,कासम मुन्निवाले इत्यादी मंडळीनी केली आहे.