कारंजा (लाड) : कारंजा येथून जवळच असलेल्या ग्राम गायवळ येथील प्रयोगशील शेतकरी रवींद्र गायकवाड यांनी आपल्या 3.34 हे.आर.शेत जमिनीवरती नैसर्गिक शेतीचा अफलातून अविष्कार साकारलेला आहे यामध्ये त्यांनी एक हेक्टर क्षेत्रफळावरती चिया सीड व किंनवा सीडची लागवड केलेली असून यामधून त्यांना अंदाजे दीड लाखाचे निवड नफा होण्याची शक्यता आहे तसेच एक हेक्टर क्षेत्रफळावरती मोहरी पिकाची लागवड केली असून अल्पशा पाण्यामध्ये एकरी उत्पादन सात क्विंटल येण्याची शक्यता आहे यामधून अंदाजे एक लाख चाळीस हजाराचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. तशा पद्धतीचा करार कंपनीसोबत त्यांनी केलेला आहे व चीया सीड किंनवा सीड व मोहरी पिक या पिकांना पाणी कमी लागते तसेच शून्य मशागत पिकामध्ये तंत्रज्ञान वापरून सदर पिकांना अंतर मशागत करण्याची आवश्यकता पडत नाही तसेच सदर पिकांना जंगली जनावराचा सुद्धा त्रास होत नाही यामुळे हे पिके शेतकऱ्यांना लखपती बनवणारी पिके असून शेतकऱ्यांनी चीया सिड ,किंनवा सीड व मोहरी या पिकाकडे वळण्याचे आवाहन रवींद्र गायकवाड यांनी केलेले आहे.
शेत बांधावरतीच नैसर्गिक निविष्ठा तयार केल्या असून फवारणी व खताचा खर्च त्यांनी वजा केलेला आहे. स्वतःच्या शेतावरतीच गांडूळ खताची निर्मिती नैसर्गिक निविष्ठाची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करून स्वतःच्या शेतामध्ये शंभर टक्के वापर त्यांनी केलेला आहे त्यामुळे त्यांचा निविष्ठेवरचा खर्च हा शून्य झालेला आहे. शेतकरी ते थेट ग्राहक विक्री वरती जास्त भर देत असून स्वतःच्या शेतामध्ये उत्पादित झालेल्या महालाकरिता त्यांनी व्हाट्सअप ग्रुप, फेसबुक, च्या माध्यमा द्वारे खूप मोठे मार्केट तयार केलेले आहे. जिल्हा कृषी अधीक्षक आरिफ शहा सर यांच्या प्रशिक्षणातून प्रेरित होऊन रवींद्र गायकवाड यांनी आपली सेंद्रिय शेतीची सुरुवात केली होती आज त्यांनी आपल्या गुरुच्या मार्गदर्शनामध्ये सेंद्रिय शेतीचे अफलातून मॉडेल तयार केलेले आहे व ते शेतकऱ्यांकरिता विस्तार शिक्षणाचे खूप मोठे काम करीत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लखपती किसान प्रयोग पाहण्याकरता रवींद्र गायकवाड यांच्या शेतीला भेट द्यावी असे त्यांनी आवाहन केलेले आहे. गायकवाड यांना वेळोवेळी कृषी विभाग कारंजा येथे कार्यरत असलेले मंडळ कृषी अधिकारी गुणवंत ढोकणे व कृषी विज्ञान केंद्र करडा चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र काळे यांचे तांत्रिक मार्गदर्शन लाभत आहे.