गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या दृष्टीने होणाऱ्या भव्य रक्तदानासाठी पुढे यावे. -राजयोगीनी ब्र.कु.मालती दीदीचे आवाहन.
कारंजा* :
ब्रम्हाकुमारीज मार्फत आयोजीत महा रक्तदान अभीयानात, रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढे यावे.असे आवाहन कारंजा केंद्राच्या प्रमुख राजयोगीनी ब्र. कु.मालती दीदींनी केले आहे. कारंजा येथील सिंधी कॅम्प लगत असलेल्या, नागवानी हायस्कूल जवळच्या 'प्रभूमिलन' ब्रम्हाकुमारीज कारंजा ह्या ब्रम्हाकुमारीजच्या नवीन केंद्रावर दि २१ ऑगष्ट २०२५ रोजी सकाळी १० : ०० ते संध्याकाळी ०५ : ०० वाजेपर्यन्त शिबीराचे आयोजन केले आहे.
या संदर्भात अधिक वृत्त असे की,प्रजापिता ब्रम्हाकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय माऊंट आबू रोड (राज.) हेडक्वार्टरच्या दिवंगत प्रशासीका राजयोगीनी दादी ब्र.कु.प्रकाशमणी दादी यांचे अठराव्या पुण्यस्मरणानिमीत्त व विश्व बंधूत्व दिनाचे औचित्याने नेपाळसह संपूर्ण देशभरात
ब्रम्हाकुमारीज केंद्रावर महा रक्तदान अभीयान राबविण्यात येवून "गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड" करण्याचा ब्रम्हाकुमारीजचा मानस असून या अभियानात एक लाख युनीट रक्तदान संकलन करण्याचा संकल्प करण्यात आहे.त्या करीता संपूर्ण भारतातील प्रत्येक ब्रम्हाकुमारीज केंद्रांवर रक्तदान शिबीर घेण्यात येत आहे.त्यानुसार कारंजा (लाड) येथील "प्रभुमिलन" केंद्र, नागवानी हायस्कुल जवळ,सिंधी कॅम्प कारंजा जवळ,कारंजा (लाड) येथे,वाशिम जिल्हा शासकीय रक्तपेढीच्या सहकार्याने दि.२१ ऑगष्ट २०२५ रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. तरी ह्या मानवसेवी स
कार्यासाठी,आपले सामाजिक दायित्व ओळखून,प्रत्येक कारंजेकर रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणात स्वेच्छेने समोर येवून आपले रक्तदान करावे.असे आवाहन ब्रम्हाकुमारीज केंद्र कारंजाच्या संचालिका राजयोगीनी ब्र.कु.मालती दिदी यांनी केले असल्याचे संयोजक डॉ.निखीलभाई कटारीया यांनी संवादाद्वारे सांगीतल्याचे ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे, प्रा.अशोकराव उपाध्ये, प्रदिपभाई वानखडे यांनी कळवीले आहे.