वाशिम जिल्ह्यातील कामरगाव मधल्या डॉक्टर अब्दुल अकील यांनी आंतरराष्ट्रीय मानद डि.लीट .डी .डी . एससी आणि एल एल डी पदव्या प्राप्त करून एकमेव भारतीय असल्याचा बहुमान मिळवीला आहे . सन २०२२-२३ मध्ये मानव अधिकार, शांतता व मानवतावादी कार्यात विशेष कामगिरी बद्दल डॉ अब्दुल अकील यांना थेओपनी इंटरनेशनल युनिव्हर्सिटी हैती.
युएनआयएजीएसएफएमआय युनिव्हर्सिटी व्हेनेझुएला,एफएबीसीडबलयुए ग्लोबल क्रिशचन युनिव्हर्सिटी अमेरिका /नायजेरिया आणि झिआजो बायबल कॉलेज युनिव्हर्सिटी झामबिया यांनी वरील आंतरराष्ट्रीय मानद पदव्या देऊन डॉ अब्दुल अकील यांचा गौरव केलेला आहे.
असा मान मिळविणारे ते २०२२-२३ वर्षातील एकमेव भारतीय असून संपूर्ण जगात त्याचे कौतुक केले जात आहे. त्याचप्रमाणे त्यांनी या क्षेत्रात पीएच.डी आणि टीएच.डी सुद्धा मिळविलेली आहे.