दिनांक 23 ऑक्टोम्बर 2022 रोजी रविवारला ब्रम्हपुरी शहरातील सामाजिक कार्य करणारी, न्यू लाईफ बहुद्देशिय संस्थेमार्फत बोन्डेगाव परिसरातील भटके व गरजू लोकांना आज सकाळी 10 वाजता, दिवाळी निमित्त सर्वांना थंडीचे उबदार कपडे, शर्ट- पॅन्ट, महिलांना साडी, सलवार, बेडसीट, ब्लॅकेट्स, चिवडा, बिस्किट्स पॉकेट्स भेट स्वरूपात वाटप करण्यात आले.
ह्या उपक्रमाप्रसंगी बोन्डेगावचे माजी पोलीस पाटील श्री.ऋषीजी करंबे, संस्थेच्या अध्यक्षा कु.पूनम कुथे, उपाध्यक्ष श्री.अरविंद नागोसे, सचिव श्री.उदयकुमार पगाडे, सौ.प्रिया नागोसे, आर्यन नागोसे, श्रुती मेश्राम, सम्यक रामटेके, टोनी रामटेके, तृप्ती नागदेवते तसेच विशेष सहकार्य म्हणून श्री.मयूर किसान आणि सौ.विभाताई चंद्रकांत मेश्राम यांनी सहकार्य केले.