कारंजा (लाड) : कारंजा नगरीच्या स्थानिक राजकारणात नवख्या असलेल्या मायमाऊली सईताई डहाके यांचेवर आयुष्यभर स्थानिक नेत्याच्या राजकारणासाठी झुंज देणाऱ्या, विकास महर्षी स्व.प्रकाशदादा डहाके यांच्या आकस्मिक निधनाने कुटूंबाची जबाबदारी येवून पडली.डहाके परिवाराकरीता कुटूंब म्हणजे केवळ स्वतःचा परिवार केव्हाच नव्हता तर, "संपूर्ण कारंजा मानोरा मतदार संघ म्हणजे कुटूंब"अशी त्यांची दूरदृष्टी राहीलेली होती. "वसुधैव कुटूंब" करीता त्यांचा लढा राहीलेला होता.त्यामुळे दादांच्या अनपेक्षित जाण्याने मतदार संघाची जबाबदारी "न भुतो न भविष्यती" ह्या उक्तीप्रमाणे अनपेक्षितपणे दादांच्या अर्ध्यांगीनी सईताई डहाके यांचेवर येऊन पडली.आणि मुख्य म्हणजे सईताई डहाके ह्या आपले प्रेरणास्थान स्व. प्रकाशदादा डहाके यांनी दाखवून दिलेल्या मार्गाने आणि आपल्या प्रेमळ,मनमिळाऊ,विश्वासू स्वभावामुळे मिळालेली जबाबदारी यशस्वीपणे पेलत आहेत.त्यामुळे त्यांच्या तळागाळातील गोरगरीब समाजाकरिता सईताई डहाके करीत असलेल्या सेवाव्रती कार्यामुळे स्थानिक जनतेमध्ये त्या दिवसेंदिवस जास्तित जास्त लोकप्रिय होत असून अल्पावधीतच "कारंजेकरांची-मायमाऊली" ठरल्या आहेत.आपल्या हास्यमुख चेहर्याने आणि प्रेमळ मनमिळाऊ स्वभावामुळे राजकारणात नवख्या असूनही त्यांनी कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती,सेवा सहकारी सोसायट्यांच्या निवडणूकामध्ये, विरोधी पक्षाच्या मुरब्बी नेत्यांना अक्षरशः धुळ चारीत निर्विवाद विजय संस्थापित करून बाजार समितीच्या पहिल्या महिला सभापती होण्याचा बहुमान मिळविला आहे.त्यानंतर सन 2024 च्या विधानसभा निवडणूकीची जबाबदारी देखील अनपेक्षितपणेच त्यांचेवर येऊन पडली.त्यांचे राजयोग बलवत्तर असल्याने,अचानक घरात "लक्ष्मीची पाऊले" चालून यावीत.त्याप्रमाणे भाजपा पक्षाची उमेद्वारी त्यांचेकडे चालून आली.भाजपाच्या पहिल्या फळीतील वरिष्ठ नेते देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे भाजपानेते तथा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी त्यांचेवर अढळ विश्वास ठेवून त्यांना कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाची उमेदवारी बहाल केली.व तेवढ्याच विश्वासाने स्थानिक जनतेने त्यांना भरभरून बहुमताने मतदान करून विजय मिळवून दिला.त्याचे फलित म्हणून कारंजा मानोरा मतदार संघातील जनतेच्या विकासाची कामे मार्गी लागायला (दृष्ट लागावी अशा प्रकारे) चांगली सुरुवात झाली.ताईकडे आपल्या अडचणी,मागण्या व विकासाची कामे घेऊन जाणाऱ्या प्रत्येक मतदाराचे आमदार सईताई डहाके ह्या हसतमुखाने स्वागत करून प्रत्यक्ष अन्नपूर्णेच्या रुपाने भरभरून त्यांना विकासाचे दान देत आहेत.प्रत्येकाशी सुसंवाद साधत आहेत.मतदार संघातील गावोगावी खेडोपाडी प्रत्येक मोहल्ला वार्डात,सामाजिक कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवून मतदारांची मनं जिंकत आहेत. अशा या मायमाऊली बद्दल मतदारांच्या मनातही आपुलकी आणि आदराचे ध्रुवस्थान त्यांनी निर्माण झाले आहे.त्यांची "साधी राहणी सेवाभावी विचार" असे त्यांचे वागणे बघून आपण एका आमदारासोबत नव्हे तर आपल्या परिवारातील माता-बहिणी सोबत संवाद साधत असल्याचे समाधान मतदारांना मिळत आहे.व सईताई देखील आपण आमदार नव्हे तर तुमच्या आमच्या मधील जिव्हाळ्याची आणि सर्वसामान्य व्यक्ती असल्याप्रमाणेच सर्वांशी मिळून मिसळून प्रेमाने वागत आहेत.त्यामुळे मतदारांना देखील सईताई ह्या ह्यापूर्वीच राजकारणात का आल्या नाहीत ? असेही केव्हा केव्हा वाटत आहे.असो,सईताई ह्या मिळालेल्या संधीच सोनं करून कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचा विकास करून, मतदार संघासह आकांक्षित कारंजा व मानोरा नगरीचा कायापालट करतील.त्यांच्या नेतृत्वात लवकरच वेगाने मतदार संघातील विकासाची कामे मार्गी लागून,येथील शेतकरी सुजलाम् सुफलाम् होईल.सुशिक्षीत पदवीधर बेरोजगारांपासून तर मजूर कामगारांच्या हाताला काम मिळेल.संपूर्ण मतदारसंघाचा विकास होईल एवढी खात्री दिसत असल्याचा विश्वास ज्येष्ठ समाजसेवी पत्रकार संजय कडोळे यांनी व्यक्त केला आहे.