वाशिम :वाशिम जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी जनतेच्या तक्रारीचे निवारण होण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जाऊन त्या तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडविण्याची मोहीम हाती घेतली आहे.
त्यानुसार १८ जून २०२५ रोजी रिसोड तालुक्यातील जनतेच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी तहसील कार्यालयात आल्या व जनतेच्या समस्या व त्यांनी केलेल्या तक्रारी ऐकून घेतल्या याप्रसंगी त्यांनी प्रशासनाच्या प्रत्येक विभागातील अधिकार्यांना बोलवून त्यांच्या विभागाशी संबंधीत असलेल्या जनतेच्या तक्रारी सोडविण्याचे निर्देश दिले १८ जून रोजी पार पडलेल्या सभेमध्ये शहरातील इंदिराबाई पांडे ले-आऊट मधील नागरीकांनी मा. जिल्हाधीकारी यांची भेट घेऊन इंदीराबाई पांडे ले-आऊट मधील २ रस्त्यावर झालेल्या अतिक्रमण संदर्भात माहिती दिली या प्रसंगी तेथील रहिवाण्यांनी जिल्हाधीकारी यांना सांगीतले की इंदिराबाई पांडे ले-आऊट मधील सन्मान हॉटेल पासून ३० फुटाचा रस्ता तसेच जिरवणकर यांच्या किराणा दुकानामागुन १५ फुटाचा रस्ता अतिक्रमीत झाला असुन त्यामुळे या परीसरातील नागरीकांना फार त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात तेथील रहिवाश्यांनी ११ मार्च २०२२, १४ ऑक्टोबर २०२४, १५ एप्रिल २०२५ रोजी जिल्हाधिकारी व रिसोड नगर परीषद प्रशासनाला निवेदने दिली. परंतु गेल्या ४ वर्षापासून या संदर्भात न.प. प्रशासनाने कोणतीच अतिक्रमण काढण्याची कार्यवाही केली नाही असे जिल्हाधिकारी यांना सांगीलतले त्यामुळे मा. जिल्हाधीकारी यांनी न.प. प्रशासनाला सदर दोन्ही रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याबाबत निर्देश दिले. परंतु अद्यापही या बाबत नगर परीषदेच्या बांधकाम विभागाने कोणतीही दखल न घेतल्यामुळे मा. जिल्हाधीकारी यांच्या निर्देशाला केराची टोपली दाखवीली आहे.