कारंजा : कारंजा शहरातील अनेक भागांमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण शाखेमार्फत करण्यात येणारा पाणीपुरवठा अत्यंत दूषित असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे.या संदर्भात नागरिकांच्या वतीने कार्यकारी अभियंता यांना ऑल इंडिया मजलिस - ए- इत्तेहादुल मुस्लिमीनच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष हाजी मो. युसुफ पुंजानी यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देऊन त्वरित स्वच्छ पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, सध्या मिळणाऱ्या पाण्यात दुर्गंधी,गाळ आणि आरोग्यास अपायकारक घटक आढळत आहेत.यामुळे पोटाचे आजार, पिवळा ताप आणि इतर संसर्गजन्य रोगांचा धोका वाढला असून,नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
"पाणी हा मानवी जीवनाचा मूलभूत अधिकार असून प्रशासनाने स्वच्छ,सुरक्षित आणि शुद्ध पाणीपुरवठा करणे ही जबाबदारी आहे.मात्र दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे," असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
नागरिकांनी दूषित पाणीपुरवठा त्वरित थांबवून पाण्याच्या शुद्धीकरणाची योग्य व्यवस्था करण्याची,तसेच नियमितपणे तपासलेले स्वच्छ पाणी देण्याची मागणी केली आहे.या संदर्भात प्राधिकरणाकडून तातडीने कारवाई होणार का,याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. यावेळी निवेदन देताना नगरसेवक इर्शाद अली,यूनुस पहेलवान,अ.रशीद,सलीम गारवे, काजी-ए-शहर जाकिर शेख, निसारखान,अलिमोद्दीन पिंटया भाई, नदीम राज, रहेमान नंदावाले,रज्जाक खेतीवाले, कय्यूम जट्टावाले,रमजान शेकुवाले,शकील नौरंगाबादी, उस्मान खान,अकील पहलवान, मो. वकील,जुम्मा भाई,तस्लीम रेघीवाले,आकिब चौधरी, फारूक अली, मुन्ना ठेकेदार,अ.वहीद शेख, पत्रकार साजिद शेख, आकिब जावेद, चांदभाई मुन्नीवाले,मोहसिन शेख,यूसुफ खान मौलाना,मुजाहिद खान,मो शारिक शेख,हाफिज खान, मोहज्जन खान,अ करीम, शाहिद नौरंगाबादी, रोशन बेनीवाले, सलीम परसुवाले,शोहेब शेख, शाइक अहमद यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....