स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे १२ जून २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता खुले नाट्यगृह अकोला येथे स्वर संध्या हा टेलिव्हिजन फेम कलावंतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. सदर कार्यक्रम दिव्यांगांच्या शिक्षण ,रोजगार व आरोग्यासाठी समर्पित असून दिव्यांग विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात शैक्षणिक शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. पं.हरिप्रसाद चौरसिया यांची शिष्या कृतिका जंगिनमठ यांचे बासरीवादन व गणित विषयात ७ विश्वविक्रम असणाऱ्या प्रणित कुमार गुप्ता याचे सादरीकरण या कार्यक्रमात केले जाणार असून सारेगमप फेम श्रुती भांडे ,सुर नवा ध्यास नवा फेम गायिका स्नेहल चव्हाण व दख्खनचा राजा ज्योतिबा फेम अभिनेत्री प्रतिक्षा देशमुख यांचा विशेष सहभाग असणार आहे.वर्ग दहावी,बारावी,स्नातक वस्नातकोत्तर परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा सत्कार व सदर विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमात दिली जाणार आहे .दिव्यांग विद्यार्थ्यांनी दि.25 मे २०२२ पर्यंत आपली नोंदणी व सदर कार्यक्रमाच्या प्रवेशिका मिळवण्यासाठी ०९४२३६५००९० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा असे आव्हान आयोजन समितीचे प्रा. विशाल कोरडे, संजय पिसे किशोर पाटील, मनोज कस्तुरकर,श्रद्धा मोकाशी,अनामिका देशपांडे ,प्रसन्न तापी व स्वाती झुनझुनवाला यांनी केले आहे.