वर्धा : वर्ध्यातील हिंगणघाट येथे आज भीषण अपघातात आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला. नागपूरहून हैदराबादकडे जाताना ट्रॅव्हल्सची दुचाकीला जोराची धडक बसल्यामुळे हा अपघात घडला.
वर्धा हिंगणघाटमधील वणा नदीच्या पुलावर ट्रॅव्हल्सची दुचाकीला जोराची धडक बसल्यामुळे आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. नागपूरहून हैदराबादकडे जाताना हा अपघात घडला आहे. अपघातानंतर राष्ट्रीय महामार्ग क्र ४४ वरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले. आई आणि मुलाचा असा अपघाती मृ्त्यू झाल्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.