कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे): आपल्या अचूक अंदाजानी पश्चिम विदर्भच नव्हे तर पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या गळ्यातील ताईत होत असलेले, शेतकऱ्यांचे आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या,हवामान तज्ञ गोपाल गावंडे यांनी ,महाराष्ट्र राज्यस्तरीय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष तथा जनसेवक संजय कडोळे यांचेशी दूरध्वनीवरून संवाद साधतांना आनंददायी वृत्त कळवितांना सांगीतले की,यंदा विदर्भात अल्पसा खंड घेऊन पडणाऱ्या पावसामुळे, शेतकरी बांधवांच्या शेतपिकाला पोषक पाणी मिळत असून,त्यामुळे यंदा समाधानकारक पिके होणार आहेत.चालू आठवड्यात भाग बदलत मुबलक पाऊस होणार असून,श्रावणाच्या पहिल्या सोमवारी नागपंचमीच्या पर्वावर तर अनेक भागात रिमझिम ते मुसळधार पाऊस बरसणार असून,चंद्रपूर,भंडारा, वर्धा,यवतमाळ,वाशिम, हिंगोली,अकोला,बुलडाणा, अमरावती अशा काही भागात हा पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याचे हवामान तज्ञ गोपाल गावंडे यांनी कळविले आहे.