कारंजा-मानोरा मतदार संघातील जनतेच्या वतीने आदर्श समाजसेवक संजय कडोळे यांची ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी. कारंजा (लाड) शनिवार दि. 31 ऑगस्ट 2024 च्या सायंकाळ पासून,वाशिम जिल्ह्याच्या अनेक भागात व कारंजा मानोरा तालुक्यात सततधार पाऊस सुरु असून या पावसामुळे कारंजा ते मानोरा मार्गावरील ग्राम दापुरा आणि ग्राम इंझोरी येथील नाल्यांना पूर आल्याने कारंजा मानोरा हा दोन तालुक्यांना जोडणारा मार्ग तसेच पावसामुळे नदी नाल्यांना आलेल्या पुराने इंझोरी ते बोदेगाव ; जनुना ते धामणगाव (देव) मार्ग ; रुई ते राजना हा मानोरा (वाशिम) पुसद (यवतमाळ) दोन जिल्ह्यांना जोडणारा मार्ग बंद झाले असून, वाशिम काटा मार्गे किन्ही राजा ; मंगरुळपिर ते अकोला ; वाशिम शेलूबाजार मार्गावरील नदी नाले तुडूंब वहात असल्याने अनेक मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याचे वृत्त आमच्या ठिक ठिकाणच्या प्रतिनिधी कडून मिळत आहे. त्याच प्रमाणे कारंजा मानोरा मतदार संघातील शेतकरी राजाच्या शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान झाले असल्याने अक्षरशः जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज रोजी शेतकऱ्याच्या शेतात पाणी शिरल्यामुळे अनेक शेतकऱ्याच्या हाताशी आलेले सोयाबिन पिक पिवळे पडले आहे.तसेच यापुढेही पुढील पंधरा दिवस पाऊस असल्याचा अंदाज व्यक्त होत असल्याने, सावकाराच्या पाशात कर्जबाजारी होऊन आणि जवळ असलेले दागीने विकून,बि बियाणे खते भरून शेतीची मशागत करणाऱ्या शेतकरी राजा आणि अल्पभूधारक शेतकऱ्यावर ओल्या दुष्काळाचे संकट ओढवल्या जात आहे.त्यामुळे आता मायबाप सरकारने स्वतः शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन, नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करीत तत्काळ पंचनामे करावेत. जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस, मानोरा येथील तहसिलदार आणि कारंजा येथील तहसिलदार कुणाल झाल्टे यांनी तात्काळ पंचनाम्याचे आदेश देवून शेतकऱ्याच्या नुकसान भरपाई करीता शासनाकडे प्रकरण सादर करावे. आणि शासनाने कारंजा मानोरा तालुक्यात अविलंब ओला दुष्काळ जाहिर करावा. अशी मागणी प्रसिद्धी पत्रकाद्वारे शेतकरी मित्र तथा आदर्श समाजसेवक संजय कडोळे यांनी केली आहे.