ऐतिहासिक, धार्मिक, आध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेली "कारंजा"नगरी वैभव संपन्न असून जगविख्यात आहे . कारंजा नगरीतील बळीराजांच्या कृषी उत्पादनाच्या खरेदी विक्री करीता येथील बाजारपेठ अख्ख्या भारतातील, सर्वात प्रथम स्थापन झालेली पहिली बाजारपेठ आहे हे कारंजा शहरात आर्थिकदृष्टया उचलेले गेलेले देशातील पहिले पाऊल ठरले होते . त्यामुळे अर्थशास्त्रात जणू कारंजाचे नाव सुवर्णाक्षरात आहे . असी ही कारंजा नगरी वैभवसंपन्न जैन धर्मियांची नगरी म्हणूनही ओळखली जाते . येथील जैन लाडांचे नावावरून कारंजा [ लाड ] म्हणून लाडाचे कारंजे ओळखल्या जाते . येथून सोन्याचा धूर निघायचा असे म्हणतात . त्यामुळे की काय ? येथील एका जैन समाजाच्या लाडाने, दिल्ली येथून आलेल्या एका अरब मुस्लिम व्यापार्याकडील कस्तूरी सोन्याच्या मोहराच्या बदल्यात घेऊन मातीसोबत तुडवून कस्तुरीने हवेली बांधली होती हा इतिहास आहे . अशा या कारंजा शहराची धार्मिक दृष्टया सुद्धा विशेष ओळख आहे . येथील काष्टासंघ पद्ममावती देवी मंदिर,दिगंबर जैन मंदिर, महाविर ब्रम्हचर्याश्रम, श्री नृसिह सरस्वती मंदिर, श्री कामाक्षा देवी संस्थान हे जगत विख्यात असून, देश विदेशातून भाविक भक्त येथे पर्यटनाला व देवदर्शनाला येत असतात .
अशा ऐतिहासिक अशा कारंजा येथील , जैन समुदायाच्या काष्टसंघ श्री पदमावती मंदिरात श्री पदमावती देवीचा महोत्सव मोठ्या आनंद व उत्साहात साजरा करण्यात आला . रविवार दि . १७ एप्रिल रोजी श्री पदमावती देवीची पालखी रथयात्रा काढण्यात आली . संपूर्ण रात्रभर ही पालखी मिरवणूक सुरु होती . मिरवणूकीचे आकर्षण म्हणजे महिला मंडळाचे लेझीम पथक सर्वाचे लक्ष वेधून घेत होते . तसेच लेझीम पथकातील शेकडो महिला एकाच रंगाच्या वेशभुषेत असल्यामुळे खुपच मनोहारी दृश्य दिसत होते . शिवाय रथयात्रा मिरवणुकीत पंचक्रोशीतील खेड्यापाड्यातील आणि शहरातील महिला व पुरुष भजनी मंडळ सहभागी झाले होते . रात्रभर कारंजेकर मंडळी रथयात्रेचा आनंद लुटत होते असे वृत्त रथयात्रेतील सहभागी प्रत्यक्षदर्शी संजय कडोळे यांनी कळविले आहे .