कारंजा :- दिनांक ५ऑगस्ट २०२४ रोजी महाराष्ट्र प्रदेश भाजपा अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी कारंजा येथील ॲड.ज्ञायक राजेंद्र पाटणी यांच्या जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी ॲड.ज्ञायक पाटणी यांनी त्यांचे पुष्प गुच्छ देवुन स्वागत केले. यावेळी भाजपा वाशीम जिल्हा अध्यक्ष शामभाऊ बढे, भाजपा तालुका अध्यक्ष डॉ.राजीव काळे,भाजपा शहराध्यक्ष ललित चांडक, अशोक चव्हाण, श्रीकृष्ण मुंदे आदींसह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते, स्थानीक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी, महीला आघाडी, अन्य आघाड्याचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होते. पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी स्वागत केले.
कार्यालया समोर आगमन होताच फटाके फोडून कार्यकर्त्यांनी आपला उत्साह प्रगट केला. ग्रामीण व शहरी भागातील भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.