मानोरा/कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : मानोरा तालुक्यातील,रुईगोस्ता येथील हवामान तज्ञ गोपाल गावंडे यांनी काल शनिवारी,महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे संजय कडोळे यांना हवामान वृत्त देतांना, रविवारी पूर्व विदर्भात गडचिरोली,भंडारा,चंद्रपूर,येथे भाग बदलवत जास्त प्रमाणात तर यवतमाळ, बुलडाणा, वाशिम अकोला,अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात, सांयकाळी वारे वाहून तर रात्री देखील पाऊस पडणार असे सांगीतले होते त्याप्रमाणे पश्चिम विदर्भात पाऊस होणार असल्याचे भाकित वर्तविले होते. त्याप्रमाणे बुलडाणा, अकोला, यवतमाळ, अमरावती, वाशिम जिल्ह्यात सर्वदूर पाऊस कमी अधिक प्रमाणात पडला आहे. त्याप्रमाणे त्यांचे अंदाज अचूक ठरले असल्याची माहिती शेगाव, कारंजा,मंगरुळ,मालेगाव, मानोरा वाशिमच्या ग्रामिण मिळाली आहे.शिवाय यापुढे आठवडाभर भाग बदलवत कमी जास्त पाऊस पडणार असून यापुढे ऊन पाऊसाचा खेळ दिसणार असल्याची शक्यता वर्तवली असून उद्या वाशिम जिल्ह्यात दि. 31/07/23 रोज सोमवार दुपारी संध्याकाळी पाऊस पडणार असून दि. 01/08/23 ते 02/08/23 पाऊस नाही. दि. 03/08/23 दिवसभर पाऊस पडणार नाही मात्र रात्री पाऊस पडणार . दि. 04/08/23 ते 05/08/23 पाऊस पडणार नाही असा अंदाज कळवीला आहे .