महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यभरात 3 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर या कालावधीत जनसंवाद पदयात्रा काढण्याचे ठरविले आहे. त्या अनुषंगाने सदर जनसंवाद यात्रा ब्रम्हपुरी तालुक्यात काढण्याच्या संदर्भाने नियोजनाची बैठक ब्रम्हपुरी येथे पार पडली.
काॅंग्रेसचे नेते, खासदार राहुलजी गांधी यांनी देशभरात काढलेल्या भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर ही पदयात्रा राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये काढण्यात येणार आहे. सदर पदयात्रेच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणांबद्दल जनजागृती करणे, राष्ट्रीय व राज्य पातळीवरील जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, शेतकऱ्यांचे प्रश्न या समस्यांबाबत जनतेशी संवाद साधत जनभावना जाणुन घेणे हा यात्रेचा उद्देश आहे.
सदर यात्रेची सुरुवात महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन करून होणार आहे. सदर यात्रा ब्रम्हपुरी तालुक्यातील विविध गावांतून जाणार आहे. यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन यावेळी उपस्थित मान्यवरांनी केले.
सदर बैठक काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी प्राचार्य देविदास जगनाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी बैठकीला प्रामुख्याने काॅंग्रेसच्या ओबीसी सेलचे राष्ट्रीय समन्वयक अॅड. गोविंदराव भेंडारकर, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश वारजुरकर, काॅंग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेश संघटक धनराज मुंगले, शहर काॅंग्रेस कमीटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, माजी जि.प.सदस्या स्मिताताई पारधी, माजी पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर, चिमुर विधानसभा क्षेत्रांतर्गत ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस अध्यक्ष नेताजी मेश्राम, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगलाताई लोनबले, महीला काँग्रेसच्या शहराध्यक्षा योगिताताई आमले, नगरपरिषदेच्या महीला व बालकल्याण सभापती सुनिताताई तिडके, नगरसेविका निलीमाताई सावरकर, बाजार समितीचे माजी संचालक सुरेश दर्वे, किसान काॅंग्रेस सेलचे तालुकाध्यक्ष वामन मिसार, बाजार समितीचे संचालक दिवाकर मातेरे, बाजार समितीचे संचालक प्रमोद मोटघरे, अनुसूचित जाती सेलचे जिल्हा सहसचिव प्रा.डि.के.मेश्राम, औद्योगिक सेलचे तालुकाध्यक्ष किशोर राऊत, बाजार समितीचे संचालक अरुण अलोने, माजी सरपंच राजेश पारधी, नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष बंटी श्रीवास्तव, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुरज मेश्राम, बाजार समितीचे संचालक राजेश तलमले, बाजार समितीचे संचालक संजय राऊत, बाजार समितीचे संचालक ब्रम्हदेव दिघोरे, तालुका काँग्रेस उपाध्यक्ष नामदेव लांजेवार, माजी नगरसेवक जगदीश आमले, युवक काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष अमित कन्नाके, युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रकाश खोब्रागडे यांसह विविध गावांतील ग्राम काॅंग्रेस कमेटीचे अध्यक्ष व काॅंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....