अकोला:- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बुलडोजर बाबा आतंकवाद समाजद्रोही यांच्या विरोधात कृतीने कार्य करणारे उत्तर प्रदेशचे बाबा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अकोल्यात झालेल्या विशाल जाहीर सभेमुळे काँग्रेसचा व महाय विकास आघाडीचा पाचही मतदारसंघांमध्ये पराभूत होणार या त्यांच्या सर्वेमुळे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची सभा अकोल्यात घेण्यात रद्द करण्याची नामुष्की पाळी महाविकास आघाडीवर आली आहे. असा आरो प आरोप भाजपा महानगराध्यक्ष जयंत मसणे यांनी केला. पंतप्रधान व अंतरराष्ट्रीय नेते नरेंद्र मोदी यांची डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे झालेली विशाल जाहीर सभा यशस्वी झाल्यामुळे तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बाबा योगी आदित्यनाथ यांच्या विशाल जाहीर सभेत चा जनतेचा मिळालेला पाठिंबा व महायुतीचे उमेदवार विजय अग्रवाल आमदार रणधीर सावरकर प्रकाश भारसाकळे बळीराम सिरस्कार व हरीश पिंपळे यांच्या विजय सुनिश्चित असल्यामुळे व काँग्रेसच्या अंतर्गत सर्वे मुळे सभा रद्द करण्यात आली आहे अशी माहिती काँग्रेसच्या आपल्या अतिनिकटच्या मित्रांनी दिली आहे असाही दावा मसने यांनी केला. तसेच उलेमा संघटनेने महाविकास आघाडीला दिलेला पाठिंबा हे बाळापूर येथील नितीन देशमुख यांच्यासाठी सौदा अकोल्याच्या पश्चिम विधानसभा साठी राजेश मिश्रा यांचा राजकीय बळी घेण्याचा प्रयत्न आहे हे सिद्ध झाला आहे. तसेच भाजपाचे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणारे हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात बोलणाऱ्या पक्षाचा पाठिंबा कसा घेतात व त्यांच्या पक्ष हिंदुत्ववादीची भूमिका कशी स्वीकारते असा सवाल पाठिंबा देणाऱ्यांनाही मसने यांनी उपस्थित केला आहे त्यामुळे मतदारांनी सुजाणपणे शहराच्या विकासासाठी विजय अग्रवाल यांना विजयी करावे अशी आवाहन विनंती जयंत मसने, यांनी केली आहे