वाशिम : जिल्हा रुग्णालय वाशिम येथे मैत्री क्लिनिकमध्ये नुकताच श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय वाशिम येथील किशोरवयीन मुला मुलींना किशोरवयात होणारे शारीरिक, मानसिक, भावनिक व सामाजिक बदल मासिक पाळी व्यवस्थापन, वैयक्तिक स्वच्छता,पुरक पोषण आहार, रक्तक्षयाची कारणे व रक्तक्षयास प्रतिबंध करणे आदी विषयांवर किशोरवयीन आरोग्य समुपदेशक दिपक भालेराव यांनी समुपदेशन केले.याप्रसंगी प्रा.डाॅ.प्रसेनजित चिखलिकर,प्रा.पंढरी गोरे,प्रा.डाॅ.पवार, सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण धाडवे यांची प्रमुख उपस्थिती होती.दिपक भालेराव पुढे बोलतांना म्हणाले, किशोरवयीन मुला मुलींना समुपदेशन करण्यासाठी जिल्हा रुग्णालय वाशिम, ग्रामीण रुग्णालय रिसोड, ग्रामीण रुग्णालय मंगरुळपीर, उपजिल्हा रुग्णालय कारंजा या चार ठिकाणी मैत्री क्लिनिक आहेत.राष्ट्रीय किशोर स्वास्थ कार्यक्रमांतर्गत किशोरवयीनांसाठी लैंगिक आरोग्य व संवादासाठी मैत्री क्लिनिक जिल्ह्यामध्ये स्थापित आहेत यामध्ये जिल्हयातील सर्व किशोरवयीन मुला मुलींनी अवश्य भेट द्यावी असे आवाहन किशोरवयीन आरोग्य समुपदेशक दिपक भालेराव यांनी केले.व तसेच मुला मुलींनी विचारलेल्या प्रश्नांची व शंकांचे निरसन व मार्गदर्शन दिपक भालेराव यांनी केले.हा कार्यक्रम जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल कावरखे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय वाशिम येथील विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होती.