घुग्घूस (चंद्रपूर) : येथील लॉयडस मेटल्स कंपनीतील पॉवर प्लांट मधील सब स्टेशनला आज सांयकाळी सात वाजताच्या सुमारास आग लागली असून आग इतकी भीषण होती की सर्वत्र धुरच धूर पसरला होता.
आगीची भीषणता लक्षात घेता तातडिने नगरपरिषदेच्या अग्निशमन वाहन बोलविण्यात आले. आगीत लाखो रुपयांची नुकसान झाली असून आग लागण्याचे कारण अद्याप माहीत झाले नाही.
आग विझिण्याचे कार्य सुरु असून पोलिस ही घटनास्थळी दाखल झाले आहे.