कारंजा (लाड) : जवान आणि किसान हे दोन्ही आपल्या देशाचा स्वाभिमान असून,एकीकडे भारतिय जवान देशाच्या रक्षणा करीता सीमेवर लढत असतो तर दुसरीकडे किसान म्हणजे शेतकरी देशातील प्रजेला जगविण्याकरीता मोठ्या कष्टाने शेती पिकवित असतो. त्यामुळे जवान असो वा किसान दोघांमध्ये देशभक्तीची भावना ओतप्रोत भरलेली असते.त्यामुळे कारंजा शहरातील शेतकरी असलेले जोहरापूरकर कुटुंबीय हे दरवर्षी आपल्या कुटुंबीय,शेतमजूर व मित्रमंडळी सह आपल्या शेतावर स्वातंत्र्यदिन मोठ्या हर्षोल्हासात साजरा करीत असतात. यंदाही त्यांनी दि 15 ऑगष्ट 2024 रोजी, देशाच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त,मोहित रमणीका ह्या कारंजा ते यवतमाळ मार्गावरील शेतावर,सालाबाद प्रमाणे ज्येष्ठ शेतकरी शरद जोहरापूरकर यांच्या अध्यक्ष खाली व त्यांच्याच हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून शेतकरी मित्र असलेले महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग जनसेवक संजय कडोळे हे होते. ध्वजारोहणानंतर ध्वजवंदन व राष्ट्रगीत घेण्यात आले.यावेळी प्रविण करडे, श्रीकृष्ण सुरजुसे, दिनेश सेंधवकर, ललित रोडे, राजेश रुईवाले, संजय जिचकार, पंकज करडे, आदित्य सेंधवकर, यश सेंधवकर,कैलास हांडे, मोहित जोहरापूरकर, सौ वैशाली जोहरापूरकर आदींची उपस्थिति होती. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संजय कडोळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष शरद जोहरापूरकर यांनी स्वातंत्र्य प्राप्तीबद्दल देशभक्त स्वातंत्र्य सैनिक व जवानांप्रमाणेच शेतकरी राजाची भूमिका महत्वाची असल्याचे विषद केले. आभार प्रदर्शन मोहित जोहरापूरकर यांनी केले.मिष्टान्नाच्या अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.