चंद्रपूर : सावली तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी विनयभंग आणि बलात्काराच्या तीन घटना घडल्याने सावली तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
हिरापूर येथील ५० वर्षीय धनराज पतरु गोहणे या नाराधमाने एका सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीच्या अंतवस्त्रात हात घालून विनयभंग केल्याची तक्रार पीडितेच्या पालकांनी केल्याने त्यांच्यावर भांदवी ३५४ व पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली.
व्याहाड खुर्द येथील अतुल रामनाथ मानकर( १९)या आरोपीने १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून गर्भवती केले मात्र लग्नास नकार दिल्याने पालकांच्या तक्रारीवरून भादंवि ३७६ अन्वये तथा पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
तर सोनापूर येथील किशोर ऋषी मेश्राम या ( वय २५) युवकाने एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यात ती गर्भवती झाली. लग्नास नकार दिल्याने पालकांच्या तक्रारीवरून भादंवि ३७६ व पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करून पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. पुढील तपास भरोसा सेलच्या पोलीस उपनिरीक्षक अश्विनी वाकडे व नायक पोलीस शिपाई विनोद वाघमारे करीत आहेत.