वरोरा :- वरोरा शहरातील नेहरू चौक या परिसरात अनेक वर्षापासून अवैधरित्या व्हिडिओ गेम पार्लरचा व्यवसाय अविरतपणे सुरू आहे. या अवैध रित्या चालविण्यात येणाऱ्या व्हिडिओ पार्लरवर दि. 7 जानेवारी रोजी पोलीस स्टेशन वरोराच्या डीबी पथकाने धाड टाकून अवैध व्हिडिओ गेम पार्लरवर चालत असलेल्या जुगारावर दुपारच्या सुमारास कारवाई केली.
शहराच्या मध्यभागी असलेल्या नेहरु चौकात अनेक बार रेस्टॉरंट, देशी विदेशी दारूचे दुकान आहे. अनेक व्यसनाधीन नागरिक, युवक झटपट श्रीमंत होण्याच्या हावसे पोटी या अवैध व्हिडिओ पार्लर जुगार अड्ड्यावर खेळण्यासाठी जात असतात, या व्हिडिओ पार्लर ला कोणत्याही प्रकारची मान्यता नसल्याने, लायसन्स रद्द असताना जुगार खेळल्या जात असल्याच्या माहितीवरून पोलीस विभागाचे डीबी पथकाचे पोलीस उप. निरीक्षक दीपक ठाकरे यांच्या पथकाने कारवाई करीत विलास धर्माजी नेरकर रा. खांजी वार्ड, यांच्या इलेक्ट्रॉनिक व्हिडिओ गेम मशिन 5नग, किंमत 50 हजार, 1550रोख, सागर सुखराम करलुके, आंबेडकर चौक. विजय देविदास जाधव व ओमप्रकाश जाधव रा. आशीर्वाद मंगल कार्यालय याच्या दुकानातील व्हिडिओ पार्लर मशिन 5नग किंमत 50हजार, नगद 2580, प्रमोद शालिकराम पीपळकर रा. सुभाष वार्ड याच्या पार्लर वरील 4मशिन किंमत 40 हजार, व 1850 नगदी असा एकूण 1, 45हजार 980रू माल पोलिसांनी जप्त करीत आरोपी वर कलम 4,5, म.जु.का प्रमाणे गुन्हा नोंद केला, ही कारवाही उप विभागीय पोलीस अधिकारी नयोमी साठम यांच्या मार्गदर्शनात अजिंक्य तांबडे पोलीस निरीक्षक, परी पो.उप निरीक्षक अक्षय पवार दीपक ठाकरे पोलीस उप निरीक्षक, दिलीप सुर, अमोल नवघरे, मोहन निषाद, पो. अ. महेश गावतुरे, विशाल राजुरकर, संदिप वैद्य, मनोज ठाकरे यांनी पार पाडली.