वाशिम : महायुतीने "शिवसेनेच्या वाघीण" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि मातब्बर प्रतिस्पर्ध्यांचा निवडणूकीच्या रणांगणात पराभव करून तब्बल पाच वेळा लोकसभेची विजयश्री खेचून आणणाऱ्या श्रीमती भावनाताई गवळी यांची उमेद्वारी ऐन वेळेवर रद्द केली खरी.परंतु दुदैवाने महाविकास इंडिया आघाडीचे उमेद्वार संजय देशमुख यांच्या विरोधात लढण्याकरीता सक्षम असा योग्य उमेद्वार देता आला नाही.त्यामुळे जिल्ह्यातील महायुतीच्या कोणत्याही स्थानिक नेत्याला उमेद्वारी न दिल्यामुळे प्राप्त माहिती नुसार महायुतीच्या घटक पक्षामध्ये कमालीची अस्वस्थता आहे.शिवाय स्थानिक उमेद्वार नसल्यामुळे मतदार संघातील महायुतीच्या मतदारामध्ये देखील मतदाना विषयी कमालीची उदासिनता असून,तिकडे महाविकास इंडिया आघाडीची बाजू मात्र १००% मजबूत असल्याचे बोलल्या जात असून,महाविकास आघाडीचे स्थानिकचे उमेद्वार संजय देशमुख यांचा मतदार संघात गेल्या सहा महिन्या पासून जोमात प्रचार सुरू असून,प्रत्येकाच्या ओठावर संजय देशमुख यांचे नाव आणि हृदयात शिवसेनेचे मशाल चिन्ह आहे. शिवसेना प्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा फार मोठा चाहता वर्ग येथे असून मतदार संघात त्यांच्या शिवसेनेची बाजूही मजबूत आहे.शिवसेनेत फुट पाडून एकनाथ शिंदे यांनी जरी वेगळा गट काढला व मतदार संघातील खासदार आमदार जरी त्यांचे सोबत गेले असले तरी सुद्धा,जिल्ह्यातील पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी कायमच निष्ठावंत आणि प्रामाणिक राहीला आहे.त्यामुळे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघ शिवसेनेकडे कायम राखण्यात येथील सच्चा शिवसैनिक आणि त्यांचा मतदार,प्रयत्नांची पराकाष्ठा करतांना दिसत आहे.शिवाय त्यांना राष्ट्रिय काँग्रेस,राष्ट्रवादी (शरद पवार) व सर्वच घटक पक्षांची निःस्वार्थ साथ असून संजय देशमुख हे महाविकास आघाडीचे उमेद्वार असल्याने त्यांचा विजय आज रोजीच झाल्याचे मानले जात आहे.तर तिकडे महायुतीने मराठवाड्यातील नांदेडच्या रहिवाशी असलेल्या राजश्री हेमंत पाटील यांना यवतमाळ वाशिम मतदार संघाची उमेद्वारी बहाल केली आहे.मात्र महायुतीचा हा निर्णय येथील मतदारांना रुचला असल्याचे अजिबातच दिसत नाही.योगा योगाने राजश्री पाटील यांचे माहेर यवतमाळ जिल्ह्याच्या नेर तालुक्यातील सारंगपूर हे आहे.परंतु तरी देखील वाशिम जिल्ह्यासाठी मात्र त्या पूर्णतः अनोळखी आणि मराठवाड्याच्याच आहेत.त्यामुळे त्यांना वाशिम जिल्हा किंवा संपूर्ण मतदार संघ जवळ करेलच असे अजिबात वाटत नाही.शिवाय स्थानिक जनताही आता त्याच त्या पक्षाच्या उमेद्वारांना कंटाळलेली असून,मतदार संघाला परिवर्तन हवे आहे.बदल हवा आहे.कदाचित आपण मतदार संघात अपरिचित असल्याची गोष्ट महायुतीच्या राजश्री पाटील यांच्याही लक्षात आलेली असावी.आणि त्यामुळे, "मी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघाची लेक आहे. लेकीला कुणी परके समजत नाही.त्यामुळे लेकीला तुम्ही निवडून द्या." असे भावनिक आवाहन त्या मतदाराकडे करीत आहेत.आणि त्यामुळे प्रतिस्पर्ध्याचा भावनिक अंदाज लक्षात घेऊन,महाविकास आघाडीने सावध पवित्रा घ्यावा. विजयाबाबत विश्वास जरूर बाळगावा.परंतु अति विश्वासात राहून,प्रतिस्पर्ध्याच्या निवडणूक रणनितीबाबत गाफिल राहू नये. व त्याकरीता प्रत्येक खेडोपाडी,वस्त्या तांड्यावर, प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचणे गरजेचे असल्याचे मतदारांचे म्हणणे असल्याचे वृत्त दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी कळवीले आहे.