अमरावती विभागातील नवनियुक्त सहसंचालक (उच्च शिक्षण) माननीय डॉ. खांबोरकर सर यांचा महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ, कल्याण तथा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रीय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे आज सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी संघटनेचे पदाधिकारी श्री. राजाभाऊ बडे, श्री. उमेश देशमुख, श्री. विनायक पदमगिरवार, श्री. चंद्रकांत इंगळे यांच्यासह सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांचा *शाल, श्रीफळ व दत्ताची मूर्ती* देऊन गौरव करण्यात आला.
सत्कारानंतर झालेल्या चर्चेत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संघटनेच्या वतीने यासंदर्भात सकारात्मक तोडगा काढण्यासाठी आवश्यक ती भूमिका मांडण्यात आली.
सहसंचालक डॉ. खांबोरकर यांनी या प्रसंगी संघटनेच्या कार्याचा गौरव करून समस्यांवर योग्य ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले.