ब्रम्हपुरी:-
दिव्यांग व्यक्तीच्या योजना त्यांच्या पर्येंत पोहचवायच्या असतील तर त्यांची माहिती घेणे, नोंदणी करणे महत्वाचे आहे, त्यांच्या पर्येंत जाणे अनिवार्य आहे. दिव्यांग व्यक्ती समजून घेताना प्रथम त्यांच्या गरजा, समस्या यावर प्रकाश टाकावे, स्थानिक स्वराज्य संस्थेतील राखीव 5% निधीचा योग्य वितरण करून दिव्यांग व्यक्तीला मदत करावे आणि शासकीय योजनेला जोडावे असेही मा. घुबडे सरांनी मार्गदर्शन केले.
दिव्यांग व्यक्तीला समाजामध्ये/ कुटुंबामध्ये सन्मान्वित करणे. समाजामध्ये पूर्ण सहभाग घेता यावा म्हणून संधी उपलब्ध करून देणे. अव्यंगीत व्यक्तीच्या तोडीचा दर्जा देणे. समाजाच्या विकासात्मक प्रवाहामध्ये आणणे. शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन सामाजिक आणि आर्थिक स्तर उनाचाविणे, योजना, कायदे यांची माहिती देणे, या उदेशाने ब्रम्हपुरी तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये. गट विकास अधिकारी मा. आर जे घुबडे, विस्तार अधिकारी, मा. जे, के राऊत, विस्तार अधिकारी मा. मिलिंद बी कुरसंगे, विस्तार अधिकारी मा. निशांत एन मेश्राम यांच्या नेतृत्वामध्ये आणि सहकार्याने, एक दिवसीय दिव्यांग व्यक्तीचे अधिकार, हक्क, शासकीय योजना विषयक जाणीव-जागृती संवेदनशील कार्यशाळा दिनांक 26/03/025 रोज बुधवारला आम्ही आमच्या आरोग्यासाठी कुरखेडा आणि जिल्हा परिषद चंद्रपूरच्या वतीने ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच तथा उपसरपंच यांच्या सोबत घेण्यात आली. या कार्यशाळेला 100 आसपास ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच उपस्थिती होते,
या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून दिव्यांग व्यक्तीचे अधिकार विषय समन्वयक संगिता तुमडे., उत्तरा चौरे, आणि प्रेरणा गेडाम उपस्थित होते. प्रशिक्षणाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग व्यक्तीच्या योजना तळागाळा पर्येंत पोहचविणे. दिव्यांग व्यक्तीच्या सन्मानार्थ आणि संरक्षणार्थ असलेले कायदे याची माहिती दिव्यांग व्यक्तीना देणे. त्याचप्रमाणे शासन निर्णयाविषयी माहिती देणे, दिव्यांग व्यक्तीप्रती समज विकसित करणे आणि सोबत संवेदनशीलता वाढविणे. दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016 च्या कायद्या अंतर्गत 21 प्रकारची माहिती देणे. तसेच दिव्यांग व्यक्तीच्या प्रकारातील दृश्य आणि अदृश्य प्रकार त्याचप्रमाणे दिव्यांग प्रकारातील सामाजिक मॉडेल आणि वैद्यकीय मॉडेल. याबद्दल अवगत करणे. दिव्यांगत्व येण्याची कारणे काय - काय असतात आणि आपण कोणती काळजी घ्यायला पाहिजे. गावातील महत्वाचा केंद्रबिंदू म्हणून ग्रामपंचायत अधिकारी ,सरपंच उपसरपंच तथा गाव म्हणून जबाबदारी आणि कर्तव्ये याची माहिती उपस्थिताना देण्यात आली.

प्रशिक्षण घेण्यामागचा उद्देश आणि गरज हे सांगत असताना त्यामागचे बारकावे समजवून देण्यात आले कि, दिव्यांग व्यक्तीला समजून घेताना प्रथम दिव्यांग व्यक्तीची आणि दिव्यांगत्वाची ओळख करणे . योजनांची माहिती देणे. कायद्याची माहिती देणे, दिव्यांग व्यक्तीच्या मिटिंग घेणे, ग्रामपंचायतील नोंदणी करणे, दिव्यांग व्यक्तींना सन्मानन्वित करणे, समाजामध्ये दिव्यांग व्यक्तीबद्दल जाणीव – जागृती कार्यक्रम करणे, 5% निधीचे योग्य वितरण करणे. दिव्यांग व्यक्तीच्या गरजा/समस्या समजून घेणे. गरजा आणि समस्या यातील भेद स्पष्ट करणे. दिव्यांग व्यक्तींना समुपदेशन आणि मार्गदर्शन करणे, व्यसनावर नियंत्रण/अंकुश /लगाम घालणे, व्यावसायिक दृष्टीकोन प्रदान करणे. अर्थार्जनाच्या दिशेने त्यांची वाटचाल करणे, प्रमाणपत्र काढण्यासाठी प्राधन्य देणे. योजनांची माहिती देणे, वर्षातून एक किंवा दोन मार्गदर्शन मेळावे राबवून त्यांना एकत्रित आणणे आणि योजनांची माहिती देणे.अशा प्रकारे संवाद साधत एकूणच शासनाच्या योजनांची माहिती आणि त्यांची अंमलबजावणी संदर्भात कार्यशाळे माहिती कार्यशाळा यशस्वी करण्यात आली.
आपल्या प्रतिक्रिया द्या....