वाशिम/कारंजा : मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीतर्फे, रविवार दि ३० ऑक्टोबर रोजी नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरिय सामाजिक कार्यकर्ता संमेलन व गुणिजन गौरव पुरस्कार प्रदान कार्यक्रमाच्या शाही समारंभात अमरावती विभागाच्या वाशिम जिल्ह्यातील लोककलावंताच्या न्याय्य हक्का करीता सुप्रसिद्ध असलेल्या, विदर्भ लोककलावंत संघटनेच्या विजय बाबुराव पाटील खंडार, लोमेश केशवराव पाटील चौधरी आणि संजय मधुकरराव कडोळे गोंधळी यांना "राज्यस्तरिय आदर्श कार्यगौरव समाजरत्न" पुरस्काराचे, मानाचा फेटा, सुवर्णपदक, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन आदर्श समाजरत्न म्हणून गौरविण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अमरावती जिल्हयातील, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ग्राम शिरपूरचे व सध्या वाशिम जिल्ह्यात कार्यरत असलेले स्वराज्य टि व्ही चनल्सचे धडाडीचे पत्रकार आणि विदर्भ लोककलावंत संघटनेचे सचिव विजय पाटील खंडार, मानोरा तालुक्यातील जनुना (खूर्द ) चे व्यसनमुक्ती लोककलावंत लोमेशपाटील चौधरी आणि कारंजाचे विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र शासन व्यसनमुक्ती पुररस्कार प्राप्त, संजय कडोळे यांनी लोककलावंताच्या न्यायहक्का करीता गेल्या अनेक वर्षापासून शासनाशी संघर्ष केला व अखेर कलावंताना न्याय मिळवून देण्यात त्यांची संघटना यशस्वी ठरली.
त्यांच्या ह्या कार्याची मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीने दखल घेऊन त्यांना दि ३० ऑक्टोबर रोजी, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हभप श्यामसुंदर महाराज सोन्नर आळंदीकर, सौ मोनिका यशोद, गणेश जोशी, सौ मनिषा कदम, सौ मिनाक्षी गवळी, संस्थापक अध्यक्ष एड कृष्णाजी जगदाळे, स्वागताध्यक्ष एल एस दाते, शशिकांत सेलुकर, चंद्रहास गावंड, अमोल सुपेकर तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मश्री डॉ विजयकुमार शहा यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या शाही कार्यक्रमात, व्यासपिठावरून, प्रामुख्याने विदर्भ लोककलावंत संघटनेचा गौरव करीत विजय पाटील खंडार, लोमेश पाटील चौधरी तथा संजय कडोळे यांना आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार प्रदान केला आहे . असे वृत्त विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे शहर अध्यक्ष उमेश अनासाने यांनी कळविले आहे .