ब्रह्मपुरी... ब्रह्मपुरी राष्ट्रीय महामार्गापासून किन्ही गावा जवळून जुगनाळा गावाकडे जाणाऱ्या गोसीखुर्द प्रकल्पाच्या कॅनल जवळून जवळपास अर्धा किलोमीटर रस्त्याचे पूर्णता डांबरीकरण उघडले असून रस्त्याने ये जा करणाऱ्या नागरिकांना व शाळेकरी मुलांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्या रस्त्याचे त्वरित डांबरीकरण करावे अशी मागणी ब्रह्मपुरी तालुका सरपंच संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष तथा जुगनाळा ग्रामपंचायतचे उपसरपंच गोपाल ठाकरे यांनी केली आहे.
जुगनाळा हे गाव तालुक्यात मोठ्या लोकसंख्येचे गाव आहे. शिवाय ब्रह्मपुरी येथे शासकीय, शैक्षणिक, खाजगी व इतर कामकाजाला जाण्या येण्यासाठी सदर रस्त्यावर पडलेल्या मोठ्यात मोठ्या खड्ड्यांमुळे फार मोठा अडथळा निर्माण होत असून या खड्ड्यात पडल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे कपडे खराब होऊन घरी परत यावे लागते अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान सुद्धा झाले आहे. वेळीच सदर मागणीची दखल घेऊन किन्ही जुगनाळा रस्त्याचे जवळपास अर्धा किलोमीटरचे डांबरीकरण करावे .अशी मागणी सरपंच संघटनेचे माजी तालुका अध्यक्ष तथा जुगनाळा ग्रामपंचायतचे उपसरपंच गोपाल ठाकरे यांनी केली आहे.