कारंजा (संजय कडोळे,जिल्हा प्रतिनिधी) :
"कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल,तर पदोपदी संघर्ष करावा लागतो. संघर्षाशिवाय पर्याय नाही म्हणून कुठलेही करिअरचे क्षेत्र निवडताना ते क्षमते नुसार निवडा आणि जिद्द व मेहनतीने प्रयत्न करा,हे सर्व करताना महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुलेंचा वारसा सोबत घेऊन वाटचाल करा."
असे भावनिक आवाहन अकोला जि.प.च्या अध्यक्षा सौं. संगीताताई अढाऊ यांनी केले. त्या दिनांक 13 तारखेला स्थानिक कारंजा नागरी पतसंस्था येथे संपन्न झालेल्या माळी कर्मचारी सेवा मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोज नाल्हे,चला हवा येऊ द्या मालिकेचे हास्य कलावंत प्रवीण तिखे,अखिल भारतीय माळी महासंघाच्या किरणताई गि-हे,संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे,कारंजा पंचायत समितीचे सदस्य किशोर ढाकूलकार,विशाल घोडे,सौं. लक्ष्मीबाई हळदे,रामदासजी भोने,धनराज दिघडे,संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण बोळे आदी मान्यवर उपस्थित होते.प्रारंभी संत सावता माळी,महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले प्रतिमेला हारार्पण करण्यात आले.
तसेच नुकतेच महाराष्ट्रातील परिवर्तनवादी विचारवंत प्रा.हरी नरके यांचे दुःखद निधन झाले, त्यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.
गुणवंतांना मार्गदर्शन करताना सौं.किरणताई गीऱ्हे म्हणाल्या की, "सध्याचे सामाजिक वातावरण अतिशय स्फोटक झाले असून,समाजात घडणाऱ्या एखाद्या घटनेमुळे आपले भविष्यातील करियर धोक्यात येऊ नये याकरिता विद्यार्थ्यांनी यापासून सावध असावे."असे आवाहन त्यांनी केले.यावेळी मनोज नाल्हे म्हणाले कि "राजकारण हे कॅरियर म्हणून निवडतांना संघर्षाची तयारी ठेवा. अवास्तव अपेक्षा ठेवल्या नाही की,आपत्कालीन प्रसंग येण्याची शक्यता कमी होते." दीपक सदाफळे यांनी म्हटले.
तर चला होऊ द्या या मालिकेचे हास्य कलावंत प्रवीण तिखे म्हणाले की, " विद्यार्थी मित्रांनो नावलौकिक करायचा असेल, मोठे पद काबीज करायचे असेल तर फार मोठा संघर्ष करावा लागतो, त्याची तयारी ठेवा आणि आपले लक्ष गाठा."
कार्यक्रमात १०वी१२वी तसेच शिष्यवृत्ती परीक्षा,एन एम एम एस परीक्षा यामधील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह व पारितोषक देऊन सत्कार करण्यात आला.तसेच विविध स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेले, कारंजा तालुक्यातील भारतीय लष्करातील अग्नीवीर गोपाल ढगे,नुकत्याच एमपीएससी द्वारे पि.एस.आय.पदावर नियुक्ती झालेल्या वाशिम जिल्ह्यातील एकमेव महिला असलेल्या अनुजा राऊत,मुंबई हायकोर्टात लिपिक या पदावर नियुक्ती झालेले कुंदन डुकरे,टॅक्स असीस्टन्ट पदावर निवड झालेले मयूर श्यामसुंदर, एसबीआय मध्ये निवड झालेले प्रणित भवाने,काळी कारंजा येथे कोतवाल पदी निवड झालेला कृष्णा इंगळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये वर्ग 5 विच्या शिष्यवृत्ती मध्ये जिल्ह्यातून द्वितीय आलेल्या पार्थ तायडे,
वर्ग 10 विच्या श्रेयस महाजन, पुर्वा तायडे,वैष्णवी गुंजकर वर्ग 12 वी तील सुहानी हळदे, कीर्ती बुटे यांच्यासह उज्वल यश संपादन केलेल्या 70 गुणवंत विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला.नवनिर्वाचित सरपंचांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. यावेळी इन्कम टॅक्स ऑफिसर म्हणून निवड झालेल्या मयूर शामसुंदर तसेच पीएसआय पदी निवड झालेल्या अनुजा राऊत यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष श्रीकृष्ण बोळे यांनी केले.संचालन हेमंत पापळे, अनुप डहाके यांनी तर आभार प्रदर्शन विशाल वैद्य यांनी केले. कार्यक्रमाकरिता संघटनेच्या योगेश्वर शामसुंदर,विजय भड,महेंद्र धनस्कर,परमेश्वर व्यवहारे,सचिन महाजन,राजेंद्र शामसुंदर,गुलाबरावं पापळे, कुणाल पापळे,गिरीश जिचकार यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम असल्याचे वृत्त पत्रकार विजय भड यांनी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष जनसेवक संजय कडोळे यांना कळवीले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....