वाशिम : यापूर्वी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील,विना वातानुकुलीत शयनयान,शिवनेरी जन शिवनेरी बसेसमध्ये दिव्यांगाकरीता राखीव आसने नसल्यामुळे,लांब प्रवासावर जात असतांना दिव्यांगाची अक्षरशः हेळसांड होत होती.दिव्यांगाना पायामुळे उभे रहाता येत नाही.हाताने पकडता येत नाही.अंध दिव्यांगांना डोळ्याने दिसतही नाही.परंतु तरीही इतर सर्वसामान्य प्रवाशांकडून त्यांचेवर दयामाया केली जात नव्हती. वाहकाचे सुद्धा सहकार्य मिळत नव्हते.ही गोष्ट हेरुन अखेर महाराष्ट्र दिव्यांग संस्था कारंजाचे महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त आदर्श दिव्यांग समाजसेवक संजय कडोळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,परिवहन मंत्री आणि रा.प.परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक यांना,गरजू दिव्यांग प्रवाशासाठी राखीव आसने ठेवण्याची विनम्रपणे मागणी केली.व त्या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला.त्यामुळे अखेरीस, महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांच्या विनम्र मागणीला यश येऊन, अखेरीस महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक माननिय.श्री. जगताप यांनी विनावातानुकीलीत शयनयान, शिवनेरी आणि जन. शिवनेरी बसगाड्या मध्ये दिव्यांगा करीता कायमस्वरूपी राखीव आसने ठेवलेली असून,सदर आसने स्वतः वाहकाने दिव्यांगाना उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.बसमध्ये दिव्यांग प्रवाशी नसतील तरच या आसनावर इतर प्रवाशी बसू शकतील.मात्र दिव्यांग प्रवाशी चढल्यास सदर दिव्यांगाचे आसन दिव्यांगालाच वाहकाकडून उपलब्ध करून द्यावे लागणार आहे.अशा आदेशाचे पत्र क्र.राप/वाह/सवलत 3353 परिपत्रक क्र.10/2024 दि.02/ 09/2024 द्वारे महाव्यवस्थापक माननीय जगताप साहेब यांनी दिव्यांग प्रवाशांना दिलासा दिला. त्याबद्दल महाराष्ट्र दिव्यांग संस्था कारंजाचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी समाधान व्यक्त केले असून महामंडळाचे आभार व्यक्त केले असून,आता दिव्यांगांना वाहकांनी नि:स्पृह भावनेने सहकार्य करणे अपेक्षीत असल्याचे म्हटले आहे.