कारंजा (लाड) : शासन मान्य वैदर्भिय नाथ चॅरिटेबल ट्रस्ट (रजि.) कारंजा (लाड) जि.वाशिम ह्या मानवसेवी संस्थेकडून सामाजिक,राजकिय,सहकार,शिक्षण,उद्योग,कृषी,साहित्य,अष्टपैलू कला,लोककला,क्रिडा, पर्यावरण,आरोग्य,आध्यात्म्य,पत्रकारिता,युवा,महिला क्षेत्रातील सेवाव्रती कार्य करणार्याला प्रोत्साहन देवून यशस्वी व्यक्तीमत्वांचा गुणगौरव करण्याच्या उद्देशाने,दि. २३ फेब्रुवारी २०२५ रोजी तहसिल कार्यालय कारंजा समोरील सिंधी कॅम्प परिसरातील भव्य अशा गोंविद भवन सभागृहात, प्रतिष्ठित मान्यवर-महाराष्ट्र राज्याच्या मंत्री महोदय,आमदार,आणि महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त मान्यवरांच्या उपस्थितीत, महाराष्ट्र भूषण,विदर्भभूषण व इतर विविध राज्यस्तरिय पुरस्कार वितरणाचा यशस्वी भव्य दिव्य शाही सोहळा आयोजीत केल्या जाणार आहे. वाशिम जिल्ह्यात होणारा हा पहिलाच कार्यक्रम असून, आजतागायत उपेक्षीत असलेल्या,तळागाळातील आणि विशेषतः कारंजा नगरीतील आणि तमाम महाराष्ट्राच्या ग्रामिण भागातील सच्च्या देशभक्त कार्यकर्त्यांचा गुणगौरव होऊन त्यांना देशसेवा आणि समाजसेवेसाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून वैदर्भिय नाथ चॅरिटेबल ट्रॅस्टचा हा छोटेखानी प्रयत्न आहे.सदहू कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या पुरस्कारार्थींना मानाचा फेटा बांधून, दुपट्टा,आकर्षक मेडल, पुरस्काराचे सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात येईल.पुरस्कार समारंभानंतर सर्वच पुरस्कारार्थीची भोजनाची व्यवस्था करण्यात येईल.तरी इच्छुक सेवाव्रती व्यक्ती,समाजसेवक, कला,क्रिडा,साहित्य व सर्वच क्षेत्रातील व्यक्तींनी आपल्या कलागुणांना वाव मिळून आपल्या कार्याची महती इतरांना कळावी व त्यामधून इतर लोकांना समाजसेवेकरीता प्रेरणा मिळावी ह्यासाठी कार्यक्रमात सहभागी व्हावे.सहभागाकरीता आयोजक : एकनाथ पवार सचिव वैदर्भिय नाथ चॅरिटेबल ट्रस्ट (रजि.) कारंजा (लाड) जि.वाशिम संपर्क क्रं.8805613780 ह्यांचेशी दि. १५ जानेवारी २०२५ पर्यंत संपर्क साधावा.असे आवाहन वैदर्भिय चॅरिटेबल ट्रॅस्ट कारंजातर्फे करण्यात आले आहे.