कारंजा - कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार स्व.राजेंद्र पाटणी साहेब यांच्या मृत्यु परांत येत असलेल्या वाढ दिवसा निमित्त पाटणी साहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी कार्यकर्ता मेळावा आहे.तरी सर्व भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते,आघाडी , सेल सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी आवर्जून उपस्थित रहावे ही विनंती.या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन ज्ञायकभाऊ राजेंद्र पाटणी,भाजपा तालुकाध्यक्ष डॉ.राजीव काळे, भाजपा शहर अध्यक्ष ललित चांडक यांनी केले आहे.महेश भवन कारंजा येथे संध्याकाळी ५.३० वाजता वरील कार्यक्रम आहे. दिनांक १९जून ते २३ जून पर्यंत कारंजा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या ठिकानी या जयंती निमित्त उपस्थित मान्यवर साहेबांसोबतच्या अनेक आठवणींना उजाळा देतील. त्यांना विनम्र अभिवादन करतील. असे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेला मिळाल्याचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले आहे.