कारंजा : कारंजा येथून जवळच असलेल्या ग्राम शेलुवाडा दि. 15/8/2022 रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त 75 वा स्वातंत्रदिन साजरा करण्यात आला असून गावाच्या जिल्हा परिषद मराठी शाळा,जिल्हा परिषद उर्दू , आदिक विद्यालय शाळा तसेच ग्रामपंचायत कार्यालय शेलुवाडा या सर्व ठिकाणी ध्वजारोहण करून झेंडावंदन करण्यात आले. गाव सरपंच नीलकंठ तुळासिराम कांबळे, संजय लोखंडे ग्रामपंचायत सदस्य गोपाल , माजी सरपंच भीमराव जिरे गावचे प्रतिष्ठित नागरिक सिद्धार्थ कांबळे, सदस्य रविभाऊ , नितेश , प्रमोद डोके, कार्यकर्ता रामकिशोर जयस्वाल,भारत वर्मा, रमेश वर्मा, रुपेश वानखडे ,विलास जंगले , तडसे , लोखंडे , राजेंद्र मोडक ,शिवाजी मस्के , अमोल जिरे ,प्रभाकर जिरे , विलास जिरे ,शेषराव चव्हाण गफार खान , सलाम खान रामराव सोनेकर ,मोहन सोनेकर , संतोष वर्मा ,आकाश डोके , अमोल जिरे , नासिर खान ,अहमदखान एजास भाई जबार खान गावातील समस्त मंडळी व ग्रामसेवक राठोड , गावचे पोलिस पाटील विनायक देशमुख , रामराव आदिक विद्यालय शाळेचे मुख्याध्यापक मालंठाने सर ,अंबालकर सर , खान सर ,ठाकरे मॅडम , सुर्वे सर, संतोष वानखडे ,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक गजानन चौधरी सर , देशमुख सर व समस्त शिक्षकवृंद तसेच उर्दू शाळेचे शेख सर व समस्त शिक्षक वृंद व गावातील सर्व लोकांच्या उपस्थितीत ध्वजारोहण पार पडले त्यानंतर विनोद रामकृष्ण सोनेकर यांची मुलगी कु वंशिका विनोद सोनेकर ही रामराव आदिक विद्यालय शाळा येथे शिक्षण घेत असून त्या मुलीची राज्य सरकार मार्फत वर्षाला 48 हजार रुपये शिष्यवृत्ती. मिळाली व 12 वी पर्यंत तिला मोफत शिक्षण मिळेल त्यामुळे साहजिकच घरचे आईवडील गावातील लोकांचे व शाळेची मान उंचावली आहे म्हणून रामराव आदिक विद्यालय शाळा यांचे वतीने आज स्वातंत्र्यदिन सार्वजनिक उत्सवानिमित्त त्या विद्यार्थीनीचा सत्कार करण्यासाठी नियोजन करून तिला घोड्यावर बसून तिच्या हातात त्रिशूल देऊन ढोलताशे देवून, सर्व विद्यार्थ्यांना,सर्व गावकरी व शाळेतील सर्व शिक्षक वृंद या सर्वांना फेटे बांधून सर्व विद्यार्थिनी यांनी लेझिमच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली परंतु पावसाने व्यत्यय आला होता . आरोग्य विभाग सर्व कर्मचारी अगणंवाडी सेविका मदतनीस यांनी वांशिका विनोद सोनेकर हिला शुभेच्या देण्यासाठी व स्वागत करण्यासाठी नियोजन केले त्याबद्दल तिने व तिचे आई वडील व रामराव आदिक विद्यालय शाळेचे मुखाध्यापक यांनी गावातील सर्व लोकांचे आभार मानले असे आमचे प्रतिनिधी संजय लोखंडे यांनी महाराष्ट्र साप्ता ग्रामिण पत्रकार परिषद वाशीम यांना कळविले आहे .
आपल्या प्रतिक्रिया द्या....