तालुक्यातील अनेक गावात वन्य प्राण्याचे (वाघ/बिबट) येण्याचे प्रमाण वाढल्याने भविष्यात होणारी जिवीतहानी टाळण्याकरीता त्वरीत उपाययोजना करून नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी घेऊन काँ.विनोद झोडगे जिल्हा सहसचिव कम्युनिस्ट पक्ष यांनी प्रतक्ष पद्मापुर व भूज या गावांना भेट देऊन गावकरी व वनविभागाचे अधिकारी,कर्मचारी यांच्याशी चर्चा करून नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.
ब्रम्हपुरी तालुक्यातील अनेक गावात वन्य प्राण्यांचे (वाघ / बिबट/रानटी डुक्कर / अस्वल) येण्याचे प्रमाण वाढल्याने तसेच या वर्षभरात अनेक ठिकाणी नरभक्षक वाघांच्या हल्ल्यात कितीतरी लोकांना आपला जीव गमवावा लागला. तर काही ठिकाणी पशुधन सुध्दा शेतकऱ्यांना गमवावे लागले. त्यामूळे शेतक-यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे. आपल्या जंगलाला लागून शेतकऱ्यांची शेतजमीन असून सध्या धान चूरन्याची सीजन सुरू असल्याने शेतकरी व मजूरांना जीव धोक्यात टाकून कामे करावी लागतात.
नुकताच पद्मापूर या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक परीसरात गेल्या 6-7 दिवसासापासुन वन्य प्राणी (बिबट) गावात येण्याचे प्रमान वाढलेले आहे. या 3-4 दिवसात पद्मापूर व भूज गावात अनेक जनावरे लहान वासरे,म्हशी, बकरी वन्य प्राण्यानी (बिबट) घरात घुसुन फस्त केलेली आहेत. आता तर त्याचे रोज रात्री गावात दर्शन होत आहे. मात्र आपले वनविभागाचे अधिकारी या बाबीकडे दुर्लक्ष करीत आहेत . सदरचे वन्य प्राणी आता पाळिव जनावराला मारत आहे.
आपले प्रशासन जिवीतहानी झाल्यावरच जागे होईल काय? या परीसरातील जनता भयभित झालेली असल्याने सायंकाळी घराबाहेर निघने शक्य होत नाही. अशातच प्रत्येकाचे घरी लहान मुले आहेत. ते स्वतःचे घरी अंगणात खेळतात हिच संथी साधुन वन्य प्राण्यानी (बिबट) त्यांना भक्ष केल्यास वाला जबाबदार कोण? या कोवळ्या बालकांचा जिव गेल्यानंतरच कार्यवाही करणार काय?
करीता आपल्या स्तरावरून भविष्यात होणारी जिवीतहानी टाळण्याकरीता त्वरीत उपाययोजना करावी. अन्यथा आपल्या वनविभागाचे विरोधात आम्हाला आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. व होणाऱ्या सर्व परिणामास शासन व प्रशासन जबाबदार राहील याची गांभिर्याने नोंद घ्यावी. अन्यथा कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा काँ.विनोद झोडगे यांनी दिला आहे यावेळी क्षेत्र सहाय्यक सचिन लोणारे,वनरक्षक विजय आदे व भूज, पद्मापूर गावातील नागरिक उपस्थित होते.